सोलापूर – पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही शहरातील सर्व प्रकारची दुकानं आजपासून दररोज सकाळी 7 पासून रात्री 8 वाजेपर्यंत खुली राहतील. सर्व हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स देखील 50 टक्के क्षमतेनं रात्री 10 वाजेपर्यंत सुरु ठेवता येतील. शिवाय शहरातील मॉल्स सुद्धा रात्री 8 वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत. मात्र मॉल्स मध्ये केवळ लसींच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या व्यक्तींनाच प्रवेश देणं बंधनकारक करण्यात आलं आहे.
शहरातील सर्व दुकानदार आणि अन्य कामगारांनी सुद्धा लसीच्या दोन्ही मात्रा घेणं आवश्यक असून दर 15 दिवसांनी त्यांची कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. दरम्यान, पुण्यात निर्बंध शिथिल केल्याने सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची डोकेदुखी वाढली आहे.
सोलापूर शहराच्या तुलनेत पुणे शहरातील कोरोनाची रुग्णवाढ मोठी असतानाही पुण्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी बैठक घेऊन निर्बंध शिथिलतेची घोषणा केली. त्यानंतर आता सोलापुरातील निर्बंध देखील शिथिल करावेत अशी मागणी आता जोर धरु लागली असून पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची मात्र चांगलीच कोंडी झाल्याचे दिसत आहे. पुण्याचे पालकमंत्री निर्णय घेऊ शकतात, मग तुम्ही का नाही, असा प्रश्न व्यापारी विचारू लागले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘भाजपाच्या आंदोलनानंतर अखेरीस मुख्यमंत्र्यांना बुद्धी आली’ ; भाजपचा टोला
- अखेर पुणेकरांची मागणी मान्य; सर्व दुकाने व सेवा रात्री ८ पर्यंत सुरु, तर शनिवार-रविवारी…
- युवकांनो सावधान ;डेल्टा व्हेरिएंटचा सर्वाधिक धोका तरुणांना
- आरटीई प्रवेश प्रक्रियेत बेकायदेशीरपणे प्रवेश होत असल्यास चौकशी व्हावी; पालक संघाची मागणी!
- ‘ती फक्त ट्रायल होती, त्यात एवढं काय भडकायचं ?,’ अजित पवारांचा भाजप नेत्यांना सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

