पुणे – राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे. केद्र विरुद्ध राज्य सरकार असा सामना देखील यानिमित्ताने चांगलाच रंगलेला पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर आता आरक्षणाशी संबंधित 102 व्या घटना दुरुस्तीत बदल करणारे विधेयक सरकार आज लोकसभेत मांडणार आहे.
मराठा आरक्षणाच्या निकालानंतर केंद्र सरकारने हे महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे. नवे एस. ई. बी. सी. प्रवर्ग निर्माण करण्याचा अधिकार राज्यांनाही मिळणार आहे. मात्र 50 टक्क्यांची निर्बंधाची अट शिथील करण्याची मागणी अनेकांनी केली आहे. 50 टक्के मर्यादेचं काय? या प्रश्नावरुन विरोधक आज संसदेत गदारोळ करण्याची शक्यता आहे.
102 व्या घटनादुरुस्तीनंतर एखाद्या राज्याला एखादी जात मागास ठरवण्याचा अधिकार राहीलेला नाही, असा निकाल सुप्रीम कोर्टाच्या पाच जजेसच्या बेंचने मराठा आरक्षणाचा निकाल देताना सांगितलं होतं. हा अधिकार आता फक्त राष्ट्रपती, संसद यांच्याकडेच असल्याचंही सुप्रीम कोर्टानं निकालात स्पष्ट केलं. पण आता केंद्र सरकार राज्यांना अधिकार बहाल करुन, त्या त्या स्तरावर निर्णय घेण्याचे हक्क देत आहे.
दरम्यान, या पार्श्वभूमीवर सोमवारी पुण्यात मराठा समाजाची राज्यस्तरीय बैठक पार पडत आहे. या बैठकीला खासदार संभाजीराजे छत्रपती उपस्थित राहणार आहेत.या बैठकीला मराठा अभ्यासक आणि कायदेतज्ज्ञही उपस्थित राहणार आहेत. यावेळी 102 व्या घटनादुरुस्तीसंदर्भात चर्चा होईल. या चर्चेनंतर संभाजीराजे छत्रपती पत्रकारपरिषद घेऊन पुढची भूमिका मांडतील. या बैठकीला राज्यभरातून मराठा समन्वयक उपस्थित राहणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘सगळं केंद्राने द्याव मी फक्त घरात बसणार, नाहीतर मर्सिडीज चालवणार’; भाजपची टीका
- 102 व्या घटना दुरुस्तीत बदल करणारे विधेयक सरकार आज लोकसभेत मांडणार
- पुण्यातील निर्बंध शिथिल केल्यानंतर आता सोलापुरातील निर्बंध शिथिल करण्याची होतेय मागणी
- आरटीई प्रवेश प्रक्रियेत बेकायदेशीरपणे प्रवेश होत असल्यास चौकशी व्हावी; पालक संघाची मागणी!
- ‘ती फक्त ट्रायल होती, त्यात एवढं काय भडकायचं ?,’ अजित पवारांचा भाजप नेत्यांना सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

