🕒 1 min read
मुंबई : राज्यातील निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जनतेशी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधला आहे. लसींचे दोन डोस घेतलेल्या मुंबईकरांना पास घेतल्यानंतर १५ ऑगस्ट पासून लोकलप्रवासाची सूट देण्यात आली असल्याचे ठाकरे यांनी घोषित केले आहे. यावेळी त्यांनी काही जिल्ह्यांबाबत चिंता व्यक्त करतानाच या स्वातंत्र्यदिनी प्रत्येकाने आपला परिसर, आपलं गाव, शहर, जिल्हा हे कोरोनामुक्त करण्याचा संकल्प करावा असं आवाहन केलं आहे.
उद्धव ठाकरे यांच्या आजच्या संबोधनावर भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी टीकास्त्र सोडलं आहे. ‘सगळ केंद्राने कराव आणि केंद्राने द्याव मी फक्त घरात बसणार, नाहीतर मर्सिडीज चालवणार आणि सरकारमधून ठेकेदारांची बिल काढणार- हेच धोरण,’ अशी टीका उपाध्ये यांनी केली आहे. यासोबतच, ‘सविनय कायदेभंगाच्या लढ्यानंतर १५ ऑगस्ट १९४७ ला देश स्वतंत्र झाला. सविनय नियमभंगाच्या लढ्यामुळे १५ ऑगस्ट २०२१ ला मुंबईकर स्वतंत्र झाला. घरात बसलेले तीनचाकी सरकार लोकल संघर्षापुढे नमले,’ असा टोला लगावत केशव उपाध्ये यांनी मुंबईकरांचे अभिनंदन देखील केलं आहे.
सगळ केंद्राने कराव आणि केंद्राने द्याव मी फक्त घरात बसणार, नाहीतर मर्सिडीज चालवणार आणि सरकारमधून ठेकेदारांची बिल काढणार- हेच धोरण #फेसबुकवाईव्ह
— Keshav Upadhye (@keshavupadhye) August 8, 2021
लोकल प्रवासासाठी काय अट ?
मुंबईकरांची लाईफलाईन असणारी मुंबईची लोकल सर्वसामान्यांसाठी १५ ऑगस्टपासून सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु यासाठी त्यांनी काही अटी ठेवल्या आहेत. यामध्ये ज्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. त्यातही ज्यांनी लस घेवून १५ दिवस पूर्ण झाले आहेत त्यांना हा प्रवास करता येणार आहे. यासाठी एक ऍप देखील असणार आहे त्यावर नोंदणी करणे आवश्यक असणार आहे. तसेच महापालिकेच्या विभागीय कार्यालयात देखील हा पास मिळणार आहे.
सविनय कायदेभंगाच्या लढ्यानंतर १५ ऑगस्ट १९४७ ला देश स्वतंत्र झाला.
सविनय नियमभंगाच्या लढ्यामुळे १५ ऑगस्ट २०२१ ला मुंबईकर स्वतंत्र झाला.
घरात बसलेले तीनचाकी सरकार लोकल संघर्षापुढे नमले.
अभिनंदन मुंबईकर!— Keshav Upadhye (@keshavupadhye) August 8, 2021
मुख्यमंत्री ठाकरेंनी कोणत्या जिल्ह्यांबाबत व्यक्त केली चिंता ?
‘पूर येण्याआधी देखील कोल्हापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये कोरोनाची आकडेवारी ही अधिक होती. आता पुरानंतर इतर रोगराईसह कोरोनाचा धोका देखील वाढला आहे. यासह सोलापूर, पुणे, अहमदनगर आणि बीड या जिल्ह्यांमध्ये देखील अजून कोरोना रुग्ण हे शेकड्यावर सापडत असल्याने नागरिकांनी अधिक काळजी घ्यावी. संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका हा कायम आहे,’ असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- मुंबकरांसाठी खुशखबर ! १५ ऑगस्टपासून लोकल सुरु ; मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा
- अखेर पुणेकरांची मागणी मान्य; सर्व दुकाने व सेवा रात्री ८ पर्यंत सुरु, तर शनिवार-रविवारी…
- युवकांनो सावधान ;डेल्टा व्हेरिएंटचा सर्वाधिक धोका तरुणांना
- आरटीई प्रवेश प्रक्रियेत बेकायदेशीरपणे प्रवेश होत असल्यास चौकशी व्हावी; पालक संघाची मागणी!
- ‘ती फक्त ट्रायल होती, त्यात एवढं काय भडकायचं ?,’ अजित पवारांचा भाजप नेत्यांना सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
