🕒 1 min read
मुंबई : औरंगाबाद येथे मराठी भाषा दिन व दासनवमीनिमित्त समर्थ साहित्य परिषदेच्या कार्यक्रमात राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी बोलत असतांना राज्यपालांनी समर्थ रामदास स्वामींशिवाय शिवाजी महाराजांना कोण विचारेल, असे खळबळजनक वक्तव्य केले आहे. दरम्यान, राज्यपालांच्या या वक्तव्यामुळे आता नवीन वादाला सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाचा दाखला देत छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास यांची भेट झाल्याचा कोणताही पुरावा नसल्याचा दावा केला आहे.
यासंदर्भात सुप्रिया सुळेंनी ट्विट केले असून ट्विटमध्ये त्या म्हणाल्या आहेत की,‘मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दि. १६ जुलै २०१८ रोजी दिलेल्या निकालानुसार… तपास अधिकाऱ्यांनी इतिहासतज्ज्ञ आणि इतर अभ्यासकांची मते विचारात घेतल्यानंतर न्यायालयात सादर केलेल्या पुराव्यांनुसार छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास यांची भेट झाल्याचा कोणताही पुरावा नाही. तसेच शिवाजी महाराज आणि रामदास यांच्यामध्ये गुरुशिष्याचे नाते असल्याचा देखील कोणताही पुरावा उपलब्ध नाही’, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दि. १६ जुलै २०१८ रोजी दिलेल्या निकालानुसार…
'तपास अधिकाऱ्यांनी इतिहासतज्ज्ञ आणि इतर अभ्यासकांची मते विचारात घेतल्यानंतर न्यायालयात सादर केलेल्या पुराव्यांनुसार छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास यांची भेट झाल्याचा कोणताही पुरावा नाही. pic.twitter.com/nA6cJKo9Rl— Supriya Sule (@supriya_sule) February 28, 2022
दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु कोण हे शरद पवारांनी स्पष्टपणे आपल्या भाषणात सांगितले आहे. ते म्हणतात,“जे लोक सांगतात की रामदास शिवाजी महाराजांचे गुरु होते, ते खोटं…रामदास शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते .शिवाजी महाराजांचे गुरु राजमाता जिजामाता होत्या. शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्व घडविले हे जिजामातांच्या संस्कांरांनी… त्यामुळे तुम्ही शिवाजी महाराजांचा कालखंड नीट अभ्यासला तर त्या कालखंडामध्ये रामदास नव्हते. काही लोकांच्या हातात लेखणी होती,त्यामुळे या कर्तृत्वसंपन्न महामानवाला रामदासांनी घडविलं अशी लेखणीची कमालकृत्ये केली. आणि जे लोकं मानू लागलो की महाराजांचे जे कर्तृत्व आहे ते रामदासांमुळे आहे,हे खरं नव्हे. कर्तृत्व हे स्वकर्तृत्व, शौर्य, मार्गदर्शन आणि मातेचे संस्कार यामधून महानायकाचे व्यक्तिमत्त्व या देशामध्ये आले”, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या :
- जनतेचे मनोबल वाढवणारा योद्धा म्हणून झेलेन्स्की यांचे नाव इतिहासात कोरले जाईल- संजय राऊत
- “…पण लाल किल्ल्यावर शपथ घ्यायचे स्वप्न काही सूटेना”, नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंना जोरदार टोला
- “… त्या भाजप नेत्यांनी युक्रेनप्रश्नी कुंपणावर बसून फापडा खाणेच पसंत केले”, संजय राऊतांचे टीकास्त्र
- राज्यपालांच्या वक्तव्यावर अतुल लोंढेंचे टीकास्त्र; म्हणाले,“हे लोकं सातत्याने महाराजांचा…”
- श्रीलंकेच्या मालिका विजयानंतर कर्णधार रोहितचा सहकारी खेळाडूंना विशेष संदेश म्हणाला…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
