🕒 1 min read
मुंबई : पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Environment Minister Aditya Thackeray) यांनी एक मोठे वक्तव्य केले असून मुंबईचे महत्व कमी करुन सगळं काही दिल्लीला नेण्याचा डाव सुरु आहे. मात्र २०२४ साली आपण सर्व दिल्लीमध्ये बसणार म्हणजे बसणारचं असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला आहे. दरम्यान, आदित्य ठाकरेंच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. याच मुद्द्यावरून भाजप नेते नितेश राणेंनी (Nitesh Rane) आदित्य ठाकरेंवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.
यासंदर्भात नितेश राणेंनी एक व्हिडीओ ट्विट केला आहे ज्यामध्ये आदित्य ठाकरे नारळ फोडताना दिसून येत आहेत. मात्र, तो नारळ फोडण्यासाठी त्यांना बरीच मेहनत घ्यावी लागल्याचे बघायला मिळत आहे. तसेच ‘काही करता साधं नारळ फुटता फुटेना, पण लाल किल्ल्यावर शपथ घ्यायचे स्वप्न काही सूटेना’ , असे कॅप्शन नितेश राणेंनी या व्हिडीओला दिले आहे.
https://twitter.com/NiteshNRane/status/1497878141142183938?s=20&t=Y2N3pOYKL7uz31dSepLTqA
दरम्यान, इतर पक्ष नाटकं करतात पण आपण परखडपणे बोलतो. मराठीचे काय होणार याची आजच्या दिवशी चिंता करत बसण्यापेक्षा आजचा दिवस साजरा करुया. मराठी भाषा दिल्लीच्या तख्तापुढे कधीही झुकली नाही आणि आजही ही मराठी दिल्लीपुढे झुकणार नाही, असेही आदित्य ठाकरे म्हणाले होते.
महत्वाच्या बातम्या :
- राज्यपालांच्या वादग्रस्त विधानाचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध, दिला आंदोलनाचा इशारा
- “समाजवादी पार्टीवर करा तुम्ही वार, भाजपा करणार आहे तिनशे जागा पार”, रामदास आठवलेंनी दिला नारा
- IND vs SL : कर्णधार रोहित शर्माने रचला वर्ल्ड रेकॉर्ड , धोनी आणि कोहलीसुद्धा असा पराक्रम करू शकले नाही
- आदित्य ठाकरेंच्या वक्तव्यावर सदाभाऊ खोतांचे टीकास्त्र; म्हणाले,‘मातोश्री’चं नाव दिल्ली ठेवण्याचा…’
- IND vs SL : भारतीय संघाच्या विजयासाठी श्रेयाने मोठा गेम केला यार!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
