मुंबई : संसदेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी आंदोलनावर प्रथमच भाष्य केलं होतं. आंदोलनाच्या नावाखाली उपद्रव करणाऱ्यांवर निशाना साधला होता. शेतकऱ्यांच्या पवित्र आंदोलनाला अपवित्र करण्याचं काम ‘आंदोलनजीवीं’नी केलं’, असा आरोप देखील त्यांनी केला. ‘शेतकरी गरिबीत चाचपडत राहो, असे कोणालाही वाटत नाही. शेतकऱ्यांच्या पवित्र आंदोलनाला अपवित्र करण्याचं काम ‘आंदोलनजीवीं’नी केलं’, असे मोदी म्हणाले होते.
मोदींनी आंदोलनजीवी असा उल्लेख केल्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर घणाघात केल्याचं दिसून येत आहे. शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांनी नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. केंद्रातील सत्ता गेल्यानंतर भाजपला देखील आंदोलनेच करावे लागतील, अशी टीका केली आहे.
‘उद्या भाजप पक्ष सत्तेतून बाहेर पडला तर आज ते आता ज्या आंदोलनाला विरोध करताहेत तीच आंदोलने त्यांना त्यावेळी करावी लागतील. हा देश लोकशाहीप्रधान आहे. लोकशाहीमध्ये जनता आपल्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरत असते. या देशात हुकूमशाही वा लष्करशाही नाही. ज्या देशात हुकूमशाही वा लष्करशाही आहे तिथेही लोक रस्त्यावर उतरुन आंदोलन करत आहेत.’ असं टीकास्त्र संजय राऊत यांनी सोडलं आहे.
पुढे ते म्हणाले, ‘आपल्या देशात आंदोलन व्हावी असं जर वाटत नसेल तर सत्ताधाऱ्यांनी सामान्य जनतेचा आवाज ऐकला पाहिजे. भाजपला आज आंदोलनाचा तिरस्कार वाटतोय, पण त्याच आंदोलनातून भाजपचा जन्म झालाय. उद्याही त्यांची सत्ता गेल्यानंतर याच प्रकारची आंदोलने भाजपला करावी लागतील.’
महत्त्वाच्या बातम्या
- शनिवारपासून राष्ट्रवादीची संवाद यात्रा, जयंत पाटलांच्या उपस्थितीत बीडमधून प्रारंभ
- अंकिताने साजरा केला बॉयफ्रेंड विकी सोबत असा ‘व्हॅलेंटाईन डे’
- महिला पोलिस आधिकाऱ्यांनी पकडली अवैध दारु; आरोपी जेरबंद
- मुंबई इंडियन्सने उघड केले रोहित शर्माच्या याच्या शतकी खेळीचे ‘व्हॅलेंटाईन डे’ कनेक्शन
- ‘लव इज इन द एयर’, मलायकाने अर्जुनला व्हॅलेंटाईन डेच्या दिल्या खास शुभेच्छा


