मुंबई : 14 फेब्रुवारी हा दिवस प्रेमाचा दिवस समजला जातो. या दिवशी लव्ह बर्ड्स आपले प्रेम व्यक्त करत असतात. या दिवशी बरेच लोक एकमेकांना प्रपोज देखील करतात. अशा परिस्थितीत बॉलिवूड सेलिब्रिटीसुद्धा रोमँटिक मूडमध्ये दिसत आहेत. नुकताच अंकिता लोखंडेने तिच्या चाहत्यांसाठी प्रियकर विकी जैनसोबतचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. अंकिता आणि विकी व्हॅलेंटाईन डे शिमला येथे साजरा करत आहेत. शनिवारी अंकिताने विकीसोबतचे काही फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरही शेअर केले होते हि फोटो शिमलाला जाण्याच्या अगोदरची होती.
अंकिता लोखंडेने प्रपोज डेच्या दिवशी एक व्हिडिओ इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये अंकिता ‘हॅप्पी न्यू इयर’ चित्रपटातील ‘मनवा लागे रे’ गाण्यावर डान्स करताना दिसत होती. अंकिताने हा व्हिडिओ शेअर करताना लिहिले होते की, ‘कोणाचा तरी तू होणार आहेस, मग माझाच का नाही विकी जैन. ‘हॅपी प्रपोज डे’
https://www.instagram.com/p/CLJPR3CLGVm/?utm_source=ig_web_copy_link
दरम्यान, माधुरीच्या गाण्यावर अंकिताच्या ‘कातिलाना’ डान्सवर चाहते फिदा झाले होते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. व्हिडीओत अंकिताने पिवळ्या रंगाची शिफॉन साडी नेसली होती. केवळ 15 तासांत या व्हिडीओला 2 लाखांवर लाईक्स मिळाले होते. अंकिताने तिच्या अभिनय कौशल्याच्या जोरावर सिनेइंडस्ट्रीत आपले स्थान निर्माण केले आहे. गेल्या काही दिवसापासून ती तिच्या डान्स कौशल्याने प्रेक्षकांचे मन जिंकताना दिसते आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- शनिवारपासून राष्ट्रवादीची संवाद यात्रा, जयंत पाटलांच्या उपस्थितीत बीडमधून प्रारंभ
- पंतचे दमदार अर्धशतकटीम; इंडियाचा पहिला डाव 329 धावांवर आटोपला
- महिला पोलिस आधिकाऱ्यांनी पकडली अवैध दारु; आरोपी जेरबंद
- मुंबई इंडियन्सने उघड केले रोहित शर्माच्या याच्या शतकी खेळीचे ‘व्हॅलेंटाईन डे’ कनेक्शन
- ‘लव इज इन द एयर’, मलायकाने अर्जुनला व्हॅलेंटाईन डेच्या दिल्या खास शुभेच्छा


