Share

बाळासाहेबांचा शब्द बॉलिवूड मध्ये होता आदेश, मात्र उद्धव ठाकरे सत्तेवर येताच का बिनसलं नात !

Published On: 

मुंबई : शिवसेना म्हटलं की डोळ्यासमोर एका दरारा असलेला बाळासाहेब ठाकरेंचा चेहरा सगळ्यांनाच आठवतो. शिवसेना गेली अनेक वर्ष महापालिकेत सत्ता आहे. १९९५ नंतर आज पुन्हा एकदा राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे. कंगना राणौतच्या निमित्ताने शिवसेना आणि बॉलिवूड यांच्या नात्यावर पुन्हा एकदा चर्चा व्हायला लागली आहे.

कंगना राणौतसोबतच शिवसेनेचा पंगा आहे असं नाही. तर यापूर्वीही कंगनाशिवाय बॉलिवूडच्या अनेक दिग्गज कलाकारांना शिवसेनेच्या रोषाला सामोरं जावं लागलं होतं. बाळासाहेब ठाकरे यांचा शब्द हा शिवसैनिकांसाठी अंतिम आदेश असायचा म्हणून सहसा शिवसेनेसोबत कोणी पंगा घेत नसे.

२०१० च्या आयपीएलमध्ये पाकिस्तानी खेळाडूंचा समावेश केल्याप्रकरणी शिवसेना शाहरुख खानवर भडकली होती. शिवसेना नेते संजय राऊत यांनी शाहरुख खानला तुझं घर मुंबईत आहे, पाकिस्तानात नाही, शाहरुख मुंबईला आल्यावर धडा शिकवू असा इशाराच दिला होता.
कंगनासोबत शिवसेनेचा वाद पहिल्यांदाच आहे असं नाही.

कंगणाचा सिनेमा मणिकर्णिका आणि बाळासाहेब ठाकरेंच्या जीवनपटावर आधारिता ठाकरे सिनेमा हा एकाच दिवशी रिलीज झाला. खरतरं शिवसेनेने त्यादिवशी कोणता दुसरा सिनेमा प्रदर्शित होणार नाही असं सांगितले होते. अनेकांनी सिनेमांच्या रिलीज डेट बदलल्या होत्या. पण कंगनाने मणिकर्णिका सिनेमा त्याच दिवशी रिलीज केला.

सलमान खानचा सिनेमा भाईजानच्या शुटींगवेळी पाकिस्तानी कलाकारांचा कडाडून विरोध झाला. त्यावेळी सलमान खान यांनी दहशतवादी आणि कलाकारांमध्ये फरत आहे असं सांगितले होते. सलमान खानचं हे विधान शिवसेनेला पटलं नाही. त्यांनी सलमानविरोधात ठिकठिकाणी आंदोलन केली. सलमानच्या वडिलांनी नंतर हे प्रकरण थंड केले.

४ वर्षापूर्वी कॉमेडियन कपिल शर्मा याने मुंबई महापालिकेविरोधात भ्रष्टाचाराचा आरोप लावला होता. त्यावेळी शिवसेनेने कपिल शर्माविरोधात आक्रमक भूमिका घेत थेट त्याच्या बांधकामावर कारवाई करण्याचा इशारा दिला होता.

बॉम्बस्फोट प्रकरणात अभिनेता संजय दत्तचं नाव आल्यानंतर संजय दत्तच्या डोक्यावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हात ठेवला. तत्कालीन काँग्रेस खासदार आणि अभिनेते सुनील दत्त यांनी मातोश्रीवर धाव घेत बाळासाहेबांकडे मदतीची विनंती केली होती. बाळासाहेबांनी ज्याच्या डोक्यावर हात ठेवला त्याच्याविरोधात कोणाची बोलायची हिंमत होत नव्हती हा दरारा शिवसेनेचा होता.

शिवसेनेने एकदा आपली भूमिका घेतली तर त्याच मार्गावर शिवसेना चालते. या मार्गाच्या मध्ये कोणीची आडवं आला विरोध केला तर शिवसेना कदापि ते सहन करत नाही हे वारंवार सिद्ध झालं आहे. अगदी रजनीकांतपासून कपूर, खान खानदानापर्यंत बाळासाहेबांची सगळ्यांसोबत मैत्री होती. परंतु बाळासाहेबांनी भूमिका घेतली तर तिच्या आड येणारा कोणीही त्याची तमा शिवसेना बाळगत नसे.

बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन आणि शिवसेना यांच्यातील संबंधही चांगले आहेत. कुली सिनेमावेळी जर शिवसेनेची रुग्णवाहिका आली नसती तर मी वाचलो नसतो असं अमिताभ नेहमी सांगतात, बाळासाहेब ठाकरे आणि अमिताभ बच्चन यांच्यात मैत्री होती. अनेक हिंदी, मराठी पुरस्कार सोहळ्यालाही बाळासाहेब हजेरी लावत असे.

बोफोर्स कांडमध्ये अमिताभ बच्चन यांचे नाव समोर आल्यानंतर अमिताभच्या शहंशाह सिनेमाला रिलीज न करण्यासाठी धमकी येऊ लागली. तेव्हा अमिताभने शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंकडे मदत मागितली. तेव्हा शिवसेनेचं संरक्षण अमिताभला भेटले. त्यामुळे अमिताभसाठी शिवसेना संकटमोचक म्हणून मदतीसाठी पुढे आली.

*बाळासाहेबाच्या ह्या आदेशामुळे दादा कोंडके सगळ्यापर्यंत पोहचले..

दोन प्रतिभावान व्यक्ती, अर्थातच दोन तलवारी एकाच म्यानात फार काळ राहात नाहीत, असे म्हणतात. पण अभिनयसम्राट दादा कोंडके आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची मैत्री याला अपवाद ठरली. बाळासाहेबांचे मराठी विषयाचे प्रेम आणि रसिकता यामुळे त्‍यांच्‍यात आणि दादांमध्‍ये विशेष जवळीक होती. दोघांमध्ये एक समान दुवा. तो म्हणजे भाषेवरची हुकमत आणि जनमानसाच्या मनाचा ठाव घेणारा हजरजबाबीपणा.

चित्रपट मुंबईमध्‍ये लावण्‍यात यावा यासाठी बाळासाहेबांनी शिवसैनिकांना ‘मराठा मंदिर’ वर राडा करण्‍याचा आदेश सोडला होता. दादा कोंडके यांचा आज जन्‍मदिवस आहे. त्‍यानिमित्‍त बाळासाहेब आणि दादा कोंडके यांच्‍यातील हा किस्सा आपण जाणून घेऊयात. साधारण १९७३-७४चा तो काळ. त्या काळात मराठी मानूस चित्रपट सृष्टीत असला तरीही, त्यावर अधिकाराज्य होते ते हिंदी भाषकांचेच. त्यामुळे मराठी मानसाचे बॅनरवाले चित्रपट वगळता इतरांचे चित्रपट थिएटरला लावायला थिएटर मालकांचा नकार असे. त्यात ‘सोंगाड्या’ हा दादांचा पहिलाच चित्रपट.

दादांना चित्रपट प्रदर्शीत करण्याचा ना अनुभव होता ना त्यांच्याकडे पैसा होता. त्यामुळे ‘कोहिनूर’ चित्रपटगृहाच्या मालकाने दादांचा चित्रपट प्रदर्शीत करण्यास नकार दिला. दादांचा ‘सोंगाड्या’ आणि ‘एकटा जीव..’ भारतमातामध्‍येच लागले, पण फार कमाई झाली नाही. त्याचे कारण म्हणजे हे थिएटर लहान, त्यात तिकीट दीड रुपया अन् अडीच रुपये होते.

राम राम गंगाराम’ च्या वेळी दादांना दादरचे मराठा मंदिर हवे होते, पण मराठा मंदिरचा पारशी मालक त्यासाठी तयार नव्‍हता. त्याचवेळी ‘हाथी मेरे साथी’ आणि ‘बॉबी’ हे दोन सिनेमे प्रदर्शित होणार होते. दादांनी मराठा मंदिरचा मालक फिरदोस तारापोरवाला बरोबर चार महिने आधी ‘मॉर्निंग शो’चा करार केला होता. पण करारानंतरही तारापोरवाल्‍याने दादांकडे पाठ फिरवली. दादांचा पहिलाच चित्रपट प्रदर्शनासाठी थिएटर न मिळाल्यामुळे रखडतो की काय, अशी स्थिती निर्माण झाली.दादांनी तारापोरवाल्याला थिएटरवर जाऊन हात जोडले, पण तो ऐकून घेत नव्‍हता. तारापोरवाल्याने गुंड बोलावले. दादांना बाहेर काढले. मग दादा थेट बाळासाहेबांकडे गेले. दरम्यान, मुंबईत शिवसेनेचा बोलबाला वाढत होता. दादांनी थेट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली. मराठी मानसाचा चित्रपट प्रदर्शीत करायला थिएटरमालक नकार देतो. ही गोष्ट बाळासाहेबांना खटकली.

बाळासाहेब आपल्‍या खास शैलीत म्‍हणाले होते, ‘रडताय काय असे, त्या तारापोरवाल्याचा पायजमा फाडून तुमच्या हातात देतो. थांबा जरा. बाळासाहेबांनी लगेच छगन भुजबळ आणि मोहन रावलेंना बोलावून घेतले. आत्ताच्या आत्ता त्या पारश्याला उचलून माझ्यापुढे आणा आणि मराठा मंदिरवरचे बॉबीचे पोस्टर काढा, असा आदेश दिला. अर्ध्याच तासात मोहन रावळेंनी तारापोरवाल्याला बखोटीला धरून साहेबांपुढे आणले. तिकडे भुजबळांनी पोस्टर उतरवले होते.

बाळासाहेब ठाकरे यांनी तारापोरवाल्याला कडक शब्दात सुनावले. ‘चर्चा नको, दादा कोंडकें यांचा सिनेमा लावायचा! कळलं.. अन् फक्त मॉर्निंग नाही, चारही शो! मी सांगेपर्यंत सिनेमा उतरवायचा नाही! नाही तर तुला तुझ्या थिएटरसकट उतरवीन! बाळासाहेब म्हणाले होते, ‘चला निघा आता!’ पारशी उठला. पार गळपटला होता. रावळेंनीच त्याला धरून बाहेर आणले. मराठा मंदिरला सिनेमा लागला अन् अक्षरश: धो धो चालला.

स्पर्धेतले बॉबी अन् हाथी मेरे साथी सुपर हिट झालेच, पण राम राम गंगाराम सिल्व्हर ज्युबीली हिट झाला. त्यावेळी टॅक्स फ्रीची भानगड नव्हती. या चित्रपटानेच दादांना कमाई आणि प्रसिद्धी दिली. हा सिनेमा सिल्व्हर ज्युबीली हिट झाल्यावर स्पेशल शोला बाळासाहेब ठाकरे देखील आले होते. त्यावेळी तारापोरवाला याने दादांना मिठी मारून आता यापुढे दादाचा प्रत्‍येक सिनेमा आपण आधी लावणार अशी ग्वाही बाळासाहेबांना दिली होती.

बाळासाहेबांच्या आदेशाने ‘सोंगाड्या’ ‘कोहिनूर’ला झळकला त्या दिवसापासून दादा, शिवसेना आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे नाते घट्ट झाले. इतके की, बाळासाहेब जेव्हा नाराज असत तेव्हा त्यांच्या खोलीत एकाच मानसाला प्रवेश असे, ते म्हणजे दादा कोंडके. बाळासाहेबांनीही दादांची मैत्री अखेरपर्यंत सांभाळली. इतकी की दादांचे निधन झाल्यावर बऱ्याच वर्षांनी शिवतिर्थावर अखेरचे भाषण करतानाही बाळासाहेबांनी दादा कोंडके यांची आठवण काढली होती.

*मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरेंचे बॉलिवूडशी बिनसलेले संबंध 

मलिष्का 

मुंबई : महानगरपालिका (बीएमसी) ने रेडिओचा लोकप्रिय आवाज आरजे मलिष्काला नोटीस बजावली होती. डेंग्यूच्या अळ्या मलिष्काच्या घरात सापडल्यामुळे ही नोटीस बजावण्यात आली आहे. मलिष्काने काही दिवसांपूर्वी एका व्हिडिओमध्ये बीएमसीची खिल्ली उडविली असून मुंबईतील रस्त्यांवर खड्डे व वाहतुकीची स्थिती दर्शविली होती त्यामुळे मलिष्काला बीएमसी कडून अशी नोटीस देण्यात अली होती.

कंगणा रानौत 

अभिनेत्री कंगणा राणावतचे मागील काही दिवसांपूसन राजकीय वाद चालू होते. या वादादरम्यान कंगणाच्या कार्यालयावर बीएमसीने कारवाई केली होती कंगनाचे कार्यालय तोडण्यात आले होते. सप्टेंबरमध्ये सुशांत सिंग राजपूत आत्महत्या आणि कंगनाचे महाराष्ट्र सरकारवर टीका यावरून महाराष्ट्रातील वातावरण तापले होते. या रागातूनच ही कारवाई केल्याचा आरोप कंगनाने केला होता.

तर या कारवाईशी राज्य सरकारचा काही संबंध नसल्याचे शिवसेना राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी सांगितले होते. या कारवाईवर आज उच्चन्यायालयाने निकाल दिला आहे. अभिनेत्री कंगणा हिच्या कार्यालयावरील तोडकामाच्या कारवाईच्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयानं मुंबई महापालिकेला मोठा दणका दिला आहे. उच्च न्यायालयानं बीएमसीची ही कारवाई अवैध ठरवली आहे. ‘महापालिकेने बजावलेली नोटीस आणि त्यानंतर तोडकामाचा काढलेला आदेश दोन्ही रद्दबातल करतानाच, ते कार्यालय महापालिकेला पूर्ववत करून द्यावे लागेल,’ असंही न्यायालयानं स्पष्ट केलं आहे.

‘कंगनाने कार्यालयात केलेल्या बांधकामावर महापालिकेने केलेली कारवाई ही अत्यंत घाईने आणि वाईट हेतूने, सूडबुद्धीने केल्याचे स्पष्ट दिसत आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आधी धमकी व इशारा दिला. त्यानंतर महापालिकेने अत्यंत तत्परतेने कारवाई केली, यावरून प्रशासनाचा कुहेतू होता आणि कायद्याचा आणि सत्तेचा गैरवापर केला, वैयक्तिक द्वेषापोटी कायद्याचे पालन न करता कारवाई केली हे स्पष्ट होते, असं निरीक्षण न्यायालायनं नोंदवलं होत.

सोनू सूद

अभिनेत्री कंगना रनौत नंतर अनधिकृत बांधकाम प्रकरणी अभिनेता सोनू सूदविरोधात मुंबई महापालिकेने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. जुहू येथील सहा मजली निवासी इमारत आवश्यक परवानग्या न घेता हॉटेलमध्ये रुपांतर केल्याप्रकरणी बीएमसीने अभिनेता सोनू सूदविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. पालिकेने या गोष्टीवर आक्षेप नोंदवला होता.

जुहू येथील एबी नायर रोडवरील शक्ती सागर बिल्डींगचे रुपांतर आवश्यक त्या परवानग्या न घेता रुपातंर केल्यामुळे पालिकेने पोलीस ठाण्यात सूद विरोधात तक्रार केली होती. सोनू सूद याच्या जुहू येथील सहा मजली निवासी इमारतीचे आवश्यक परवानग्या न घेता हॉटेलमध्ये रुपांतर करण्यात आले आहे. पालिकेने या गोष्टीवर आक्षेप नोंदवला होता.

दिशा सालियान

दिशा सालियान ही सुशांतची मँनेजर होती. तिचं सुशांतच्या घटनेआधी निधन झाले होत. दिशाच्या मृत्यूवर देखील नेहमीच शंका घेतली जात होती. आणि नंतर या घटनेला सुशांतसिंग प्रकरणाशीही संबंध असल्याचे अनेकांनी आरोप केले होते. त्या घटनेवरही नेहमीच शंका घेतली होती आणि नंतर या घटनेला सुशांतसिंग प्रकरणाशीही काही लोक जोडून बगत होते.

आदित्य ठाकरे हे या बॉलिवूडमधील अनेक पार्ट्यांमध्ये ते जात होते. दिशा सालियान आणि सुशांतसिंह या दोघांच्या घटनेबद्दल आदित्य ठाकरे यांना शंभर टक्के पुर्ण माहिती आहे. पण हे सामूहिक पद्धतीने लपवलं जात आहे, दररोज शिवाजी पार्कमध्ये या लोकांच्या बैठका व चर्चा होतात, काय करायचं, कसं आदित्य ठाकरेंना वाचवायचं याबाबत तेथे चर्चा केली जाते. असा आरोपही आदित्य ठाकरेंवर विरोधकांनी केला होता.

सुशांत सिंग राजपूत :

सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात रोज नवे खुलासे सामोरे आले, सुशांतच्या केसने नवनवीन वळण घेतले सुशांतच्या प्रकारावरून महाराष्ट्र सरकारवर बरीच टीका देखील करण्यात आली. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या प्रकरणाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.

सुशांतसिंहच्या प्रकरणावरून राज्यातील राजकारण बरेच तापले होते. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे द्यावा, अशी मागणी विरोधी पक्ष करत होते. तर, मुंबई पोलीस या प्रकरणाचा तपास करण्यास सक्षम आहेत, असं राज्य सरकारचं म्हणणं होत. या प्रकरणाच्या तपासासाठी  मुंबईत आलेल्या बिहारी पोलीस अधिकाऱ्याला क्वारंटाइन केल्यामुळं आरोप-प्रत्यारोपाला जोर चढला होता. महाराष्ट्र सरकार नेमकं काय लपवतंय, असा सवाल देखील सर्वत्र उपस्थित केलं जात होता.

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील या विषयावर भाष्य केले होते .एक पत्रक काढून त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती. सुशांतसिंग राजपूतचा मृत्यू दुर्दैवी तितकाच धक्कादायक आहे. मुंबईचे पोलीस या प्रकरणाचा खोलवर तपास करीत आहेत व महाराष्ट्राच्या पोलिसांना जागतिक प्रतिष्ठा आहे, पण ज्यांचा कायद्यावर विश्वास नाही तेच लोक याप्रकरणी फालतू आरोपांचा धुरळा उडवीत तपास भरकटवण्याचा प्रयत्न करीत आहेत असं त्यांनी म्हटलं होत.

*कृष्णकुंज ठरतंय आश्रयदाते :

मराठी कलाकार थिएटर सुरू करण्यासाठी कृष्णकुंज वर : 

नाटक कलाकार,निर्माते आणि दिग्दर्शकांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेत असतात, नाटक सुरु करण्यासंदर्भात येणा-या अडचणी राज ठाकरेंसमोर मांडल्या जातात. मनसेकडे सत्ता नसतानाही विविध क्षेत्रातील लोक राज ठाकरे यांना सतत भेटत असतात. लॉकडाऊनच्या काळातही अनेक लोक आपले प्रश्न घेऊन राज यांच्या भेटीला आले होते. तर राज ठाकरे यांनीही त्यांचे प्रश्न सोडवण्यात मदत केली होती. दरम्यान  मराठी कलाविश्वातील काही कलाकारांनी राज यांच्या कृष्णकुंज येथील निवासस्थानी भेट घेतली होती.

जागतिक मराठी नाट्यकर्मी संघाने आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी आले होते. त्यावेळी त्यांनी अनलॉकनंतर नाटक पुन्हा सुरु करण्यासंदर्भात येणाऱ्या अडचणींचा पाढा राज यांच्यासमोर मांडला. या शिष्टमंडळात प्रशांत दामले, वंदना गुप्ते, महेश मांजरेकर, वामन केंद्रे, पंढरीनाथ कांबळी, अजित भुरे, अतुल परचुरे यांचा समावेश होता.

*जनतेचं  न्यायालय ‘कृष्णकुंज’

‘जनतेचे न्यायालय फक्त कृष्णकुंज, तुम्ही कितीही राज ठाकरे यांना ट्रोल करा, पण तुमच्यावर संकट आले की तुमच्यासाठी फक्त कृष्णकुंजचे दार उघडे असते हे लक्षात असू द्या!’ ‘न्याय कृष्णकुंजवरच मिळतो’ अशा आशयाचे संदेश व पोस्ट मनसे कार्यकर्त्यांनी व्हायरल केले होते. विविध प्रकारच्या अडचणी सुटाव्यात म्हणून जवळजवळ सर्वच क्षेत्रातील नागरिकांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं कृष्णकुंज हे निवासस्थान गाठल्याचं दिसून येत.

कोळी बांधव, बँडवाले आणि वारकरी आपल्या विविध मागण्या घेऊन कृष्णकुंजवर जातात. बँड, घोडे, रथ आणि लग्नसमारंभासंबंधी इतर व्यवसाय सुरु करावा, या मागणीसाठी मुंबई ठाणे ब्रास बॅन्ड वेलफेअर असोसिएशनचे पदाधिकारी राज ठाकरेंची भेट घेत असतात. गेल्या काही दिवसांत, खाजगी कोचिंग क्लासेस चालक-मालक, फी-वाढ व ११ वी प्रवेशप्रक्रियांसंदर्भात विद्यार्थी-पालक, डॉक्टर, जिम मालक-चालक, हॉटेल व्यावसायिक, मुंबईचे डबेवाले यांनी राज ठाकरेंची भेट घेतात. अनेक अडचणी राज ठाकरेंच्या भेटीनंतर दूर होत असल्याने न्याय कृष्णकुंजवर मिळतो अशी भावना देखील मनसे कार्यकर्त्यांनी व्यक्त केली होती.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!