मुंबई : 14 फेब्रुवारी हा दिवस प्रेमाचा दिवस समजला जातो. या दिवशी लव्ह बर्ड्स आपले प्रेम व्यक्त करत असतात. या दिवशी बरेच लोक एकमेकांना प्रपोज देखील करतात. अशा परिस्थितीत बॉलिवूड सेलिब्रिटीसुद्धा रोमँटिक मूडमध्ये दिसत आहेत. नुकताच मलायका अरोराने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर अर्जुन कपूरच्या फोटो शेअर केला आहे.
यामध्ये अर्जुनने घातलेल्या टी-शर्टवर लिहिले आहे की, ‘लव इज इन द एयर’ असे म्हणत मलायकाने अर्जुनला व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. नववर्षाचं सेलिब्रेशन करायला मलायका आणि अर्जुनची जोडी गोव्यात पोहोचली होती. काही मित्र-मैत्रिणींसोबत आणि कुटुंबियांसोबत मलायका आणि अर्जुन सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसले होते. मलायकाने गोव्यातील काही फोटो सोशल मीडियावर शेअर देखील केले होते. त्यामध्ये मलायकाने बोल्ट लूकमधील दिसत होती. तिचे ते फोटो चाहत्यांना खूप आवडली होती.

तिच्या या फोटोमध्ये अर्जुन देखील दिसत होता. गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जुन कपूर हे लवकरच लग्न करणार असल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये रंगत होत्या. मात्र, मलायका आणि अर्जुन यांच्या लग्नाच्या चर्चेला ब्रेक मिळाला आहे. सध्या तरी दोघे लग्न करणार नसल्याची माहिती काही दिवसांपूर्वी सांगण्यात आली होती.
महत्त्वाच्या बातम्या
- शनिवारपासून राष्ट्रवादीची संवाद यात्रा, जयंत पाटलांच्या उपस्थितीत बीडमधून प्रारंभ
- पंतचे दमदार अर्धशतकटीम; इंडियाचा पहिला डाव 329 धावांवर आटोपला
- महिला पोलिस आधिकाऱ्यांनी पकडली अवैध दारु; आरोपी जेरबंद
- मुंबई इंडियन्सने उघड केले रोहित शर्माच्या याच्या शतकी खेळीचे ‘व्हॅलेंटाईन डे’ कनेक्शन
- रायगड जिल्ह्यातील ‘या’ पर्यटनस्थळांना ‘ब’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा


