Share

Uday Samant : एकनाथ शिंदेंनी गट निर्माण केला म्हणजे त्यांचे मत बदलले असं नाही – उदय सामंत

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक बंडखोर आमदार आसामची राजधानी गुवाहाटी येथे तळ ठोकून आहेत. आमदारांच्या बंडखोर वृत्तीमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची चिंता वाढली आहे. महाविकास आघाडी सरकार धोक्यात आले आहे. एकनाथ शिंदे शिवसेनेला धक्क्यावर धक्के देत आहेत. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी बंड केल्यानंतर सेनेला जशी गळती लागली आहे. या पाश्वर्भूमीवर रत्नागिरीचे शिवसेनेचे आमदार व राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

काल उदय सामंत हे मुंबईतून बाहेर होते, त्यानंतर ते कुठे गेले याविषयी चर्चांना उधाण आलं आहे. आज माध्यमांशी उदय सामंत यांनी संवाद साधला. यावेळी त्यांना प्रश्न विचारले असता त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. उदय सामंत म्हणाले,”मी शिवसेनेत आहे. नाहीतर मी गुवाहाटीला गेलो असतो. मी आता गुवाहाटीतून नाही तर पाली (रत्नागिरी) येथून बोलत आहे. कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले किंवा महाविकास आघाडीतील नेते काय बोलत आहेत, यावर चर्चा करण्यापेक्षा आम्ही सगळे एकसंघपणे राहणे गरजेचे आहे”.

तसेच पुढे बोलताना उदय सामंत म्हणाले, “मला वाटतं की कुठंतरी सगळ्यांना विश्वासात घेऊन जे आपल्यापासून दूर गेले आहेत, त्यांच्याशी चर्चा करणं गरजेचं आहे. आमच्या लोकांमध्ये जे गैरसमज असतील ते दूर करणं गरजेचं. या सगळ्या संदर्भात कोणीतरी पुढाकार घेतला पाहिजे. आमच्या प्रतोदानी काढलेली नोटीस आणि त्यांच्या प्रतोदानी काढलेली नोटीस त्यामध्ये टेक्निकली बाजू समजून घ्याव्या लागतील. त्यानंतरच यावर बोलणं उचित ठरेल,  पण भविष्यात कायदेशीर लढाई अटळ आहे आणि कायदेशीर लढाईला आम्हाला सामोरं गेलं पाहिजे. एकनाथ शिंदे यांनी गट निर्माण केला आहे म्हणजे त्यांचे मत बदलले असं नाही.”

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!