Share

कोणतेही सुरक्षेची साधने नाहीत, ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’च्या विरोधात होणार आंदोलन    

Published On: 

नागपूर : राज्यशासनाच्या ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या योजनेला राज्यभर सुरुवात झाली आहे. त्यासाठी आशा गटप्रवर्तकांना काम देण्यात आलेले आहे. पण कुठल्याही सुविधा किंवा सुरक्षा साधने पुरविण्यात आलेली नाहीत. त्यामुळे या निर्णयाच्या विरोधात नागपुरात आंदोलन होण्याची शक्यता आहे. उद्या बुधवारी सकाळी ११ वाजता हे आंदोलन होईल.

सीआयटीयूतर्फे (सेंटर ऑफ युनियन ट्रेड युनियन) राज्य सरकारने ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ हा कार्यक्रम १५ सप्टेंबर पासून राबविण्यास सुरुवात केली आहे. त्यानंतर राज्यभर आशा व गटप्रवर्तकांचा प्रचंड रोष व्यक्त होतो आहे. तिघांची टीम करून कुठेच कामास सुरुवात झालेली दिसत नाही, आरोग्य स्वयंसेवक दिला जात नाही व आशानाच ते त्यांच्या कुटुंबातील एकाचे नाव देण्याची जबरदस्ती करताना दिसत आहेत. तसेच मानधनाच्या बाबतीतही प्रशासनाच्या व्यवहारात निराशा आहे. सरपंच, ग्रामसेवक, वैद्यकीय अधिकारी यांनी या बाबत कुठेच पुढाकार घेऊन आशांना मदत करताना दिसत नाहीत.

उलट सर्वत्र जबरदस्ती व दबाव टाकून कामे लादली जात आहेत. सर्वत्र सुरक्षा साधनांचा अभाव असून कार्यक्रम राबविण्यासाठी बहुतांश साहित्य अद्यापही दिले गेलेले नाहीत. आशांकडे अँड्रॉईड मोबाइल नसताना व बहुतांश आशांना प्रशिक्षण नसताना रिर्पोटींग करण्यासाठी तगादा लावला जात आहे. गटप्रवर्तक टीमवर्क मध्ये सामील नसताना रिपोर्टींग काम व सर्वेक्षणाचे काम दिले आहे.

तुटपुंज्या मानधनावर रोज ५० घरांचे सर्वेक्षण करणे म्हणजे 10 ते 12 तास कामं करून स्वतःची व कुटुंबातील सर्वांची पिळवणूकच करण्यासारखे आहे, म्हणून कृती समिती मार्फत या बाबत आज शासनास पत्र लिहून जाब विचारण्याचे ठरवले आहे. येत्या २३ तारखेला काळ्या फिती लावून सकाळी ११ वाजता संविधान चौक, नागपूर येथे आंदोलनं करणार.

तसेच 23 तारखे पासून काळ्या फिती लावून जमेल तेवढेच काम करण्याचे व शासनाने तातडीच्या या प्रश्नांची सोडवणूक न केल्यास येत्या 5 ते 7 ऑक्टोबर दरम्यान राज्यभर संप पुकारण्यात येणार आहे. तीन दिवसीय लाक्षणिक संप 28 सप्टेंबर पासूनच करू अशी तातडीची संपाची नोटीस ही देण्याचे ठरवले आहे.

तशी संपाची नोटिस आपण सर्व पातळीवर म्हणजे दिनांक २३ सप्टेंबरला जिल्हास्तरावर, तालुका स्तरावर, आरोग्य केंद्र, नगर व महानगरपालिका स्तरावर देणार. सदर कार्यक्रम अमलात आणण्याकरिता व शासनास आपले प्रश्न लवकरात लवकर सोडवण्यासाठी भाग पाडू. शासनाने आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले तर संपाचा इशारा सुद्धा देण्यात आला असून प्रीती मेश्राम महासचिव व राजेंद्र साठे अध्यक्ष यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या :-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!