🕒 1 min read
अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- राहुरी, नगर, पारनेर या तालुक्यात के.के.रेंज विस्तारीकरणाच्या मोठ्या प्रमाणात हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे जनतेमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असतानाच आता वेगळाच श्रेयवाद सुरू झाला आहे. के.के.रेंज प्रश्नांवरून नेत्यांमध्ये आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. इतकी वर्षे तुम्ही सत्तेत असताना निवेदनाशिवाय काहीही केले नाही. के.के.रेंज प्रकरणी विरोधक शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहेत.
लेखी कागद किंवा पुरावे मागणार्यांनी ज्येष्ठ नेते खा.शरद पवार व माझे अभिनंदन करण्याऐवजी आमच्यावर टिका करायला सुरुवात केली आहे. सत्तेत असताना इतके वर्षे तुम्ही झोपले होते का, असा पलटवार आ.नीलेश लंके यांनी भाजपाचे खासदार सुजय विखे पाटील व माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्यावर केला आहे.
आ.निलेश लंके यांनी पवारांच्या नेतृत्वाखाली संरक्षण मंत्र्यांची भेट घेऊन अधिग्रहणच होणार नसल्याचे वृत्त प्रसिद्ध होताच पुन्हा खा.विखे यांनी संरक्षणमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा केली. संपादन होणार की नाही? याबाबत संसदेच्या अधिवेशनानंतर जनतेशी बोलून संभ्रम दूर करणार असल्याचे खा.विखे यांनी म्हटले.
तर विरोधक भूसंपादन रद्द होणार असल्याचा कांगावा करीत आहेत मात्र, त्यांनी याबाबतचा कागद जनतेला दाखवा तरच त्यांच्या प्रयत्नांना यश आले असे आपण म्हणू असे माजी आमदार शिवाजी कर्डिले म्हणाले होते. आता भाजपाचे खासदार सुजय विखे पाटील व माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्या टीकेला आ.निलेश लंके यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
पुढे आ.लंके म्हणाले की, मी के.के.रेंज प्रकरणी विरोधकांसारखी दिशाभूल न करता किंवा गावागावात न जाता या विषयाचा अभ्यास केला. माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या माध्यमातून हा विषय सोडविण्यासाठी दिल्लीत चार दिवस तळ ठोकला. या विषयासबंधी जनतेचा प्रतिनिधी म्हणून लोकांची भूमिका सरकारपुढे मांडत पहिल्या टप्पात निर्णायक चर्चा घडवून आणली. के.के.रेंजचा प्रश्न खा.शरद पवार हेच सोडवू शकतात, असे आ.लंके यांनी पुन्हा म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या :-
- कृषी विधेयकावरून राज्यसभेत झालेल्या गदारोळाचे पवारांनी केले खंडन, म्हणाले…
- आ.लहामटे यांच्याविरुद्ध दाखल झालेल्या गुन्ह्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचा मूक मोर्चा!
- मोठी बातमी: शरद पवार देखील करणार अन्नत्याग!
- कालचा दिवस नगरकरांसाठी दिलासादायक; जिल्ह्यात १६ मृत्यूसह ४०५ नव्या कोरोना बाधित रुग्णांची वाढ
- चंद्रपूरमध्ये पुन्हा एकदा सात दिवसांचा जनता कर्फ्यू – विजय वडेट्टीवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
