Share

चक्रीवादळाचा फटका बसलेल्या शेतांचे तात्काळ पंचनामे करण्याचे ‘या’ आमदाराचे निर्देश   

Published On: 

 मोर्शी : तालुक्यातील काही भागामध्ये अतवृष्टी झाली आहे तर काही ठिकाणी चक्रीवादळाचा फटका बसला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचे संत्रा, कापूस, तूर, मोसंबी, ज्वारी, सोयाबीन अशा विविध पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून, शेतकरी हतबल झाला आहे अशातच मोर्शी तालुक्यात वादळ वार्‍यासह झालेल्या जोरदार पावसामुळे शेतकर्‍यांचे पिकांचे मोठे नुकसान झाले असून, एकीकडे कोरोणाचे संकट तर दुसरीकडे पावसामुळे परीसरातील शेतकर्‍यांना मोठा फटका बसला आहे. आमदार देवेंद्र भुयार यांनी मोर्शी तालुक्यातील नुकसानीची पाहणी करून तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत.

आमदार देवेंद्र भुयार यांच्या पुढाकाराने मोर्शी तालुक्यात झालेल्या सोयाबीन पिकाच्या नुकसानीची भारत सरकारच्या केंदीय पथकाद्वारे करण्यात आली पाहणी करण्यात आली. सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट चे पथक मोर्शी तालुक्यात दाखल झाले असून त्यांनी खोडकीडा तसेच संततधार पावसामुळे सोयाबीन पिकावर बुरशीजन्य रोगाचे आक्रमण तसेच प्रकाश संेषण क्रिया मंदावल्याने शेंगा नीट न भरणे यासह विविध नुकसानीची पाहणी केली.

यावेळी आरसीआय पॅनलचे पदाधिकारी शंकर आप्पो, प्रल्हाद कोल्हे, उपविभागीय कृषी अधिकारी राहुल सातपुते, तालुका कृषी अधिकारी कल्पना राठोड, मंडळ कृषी अधिकारी माधुरी निंबाळकर, कृषी पर्यवेक्षक कृष्णा बोरकुटे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष हितेश साबळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष नरेंद्र जिचकार, मोहन ठाकरे, बंटी आघाडे, लाला अकोलकर, सुखदेव काळे, राम भुयार, टिकाराम मकोले, गोलू काळे, सुनील ठाकरे, सागर आखरे, धाकुलकर दादा, सुरेश बोरवार, धीरज झाडे, सागर ठाकरे, निळू इंगळे, तसेच निंभी येथील ग्रामस्थ प्रामुख्याने उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या :-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!