🕒 1 min read
नांदगाव खंडेश्वर : महावितरण वीज कंपनी नांदगाव खंडेश्वर येथे कार्यरत असलेले उपकार्यकारी अभियंता विलास शिंदे बरेच काळापासून मनमानी कारभार करीत आहेत. पुराव्याशिवाय गुन्हा दाखल होत नाही म्हणून बेसूटपणे मजूर हाती धरून ठेकेदारीच ह्या महाशयांनी सुरू केल्याचा आरोप माजी नगराध्यक्ष अक्षय पारसकर यांनी उर्जामंत्री यांना दिलेल्या तक्रारीत केला आहे.
नांदगाव खंडेश्वर शहर वीज केंद्र मौजा हिंदूराव येथील जागा (शेत) फुबगाव फाट्याजवळ अनधिकृतपणे विनापरवाना रोहीत्राची उभारणी केली आहे. धाब्याकरिता वीज पुरवठा व्हावा याकरिता या महाशयांने मजूर हाती धरून रोहित्र लावले. यवतमाळ अमरावती राज्य महामार्गाच्या हद्दीत काम करण्यात आले आहे. हे काम तात्काळ थांबविण्याचे आदेश शहर अभियंता यांनी दिले. सिंगणापूर शेत शिवारात सिंगल फेज कर्मशियल लाईन स्वखर्चाने पोल्ट्री फार्म करिता घेण्याची मागणी असताना एन.एस.सी योजनेत मंजुरात घेऊन कामाची रोहित्र उभारणी केली.
एनएससी योजनेतील रोहित्रा जंगलात बसविता येतो काय हा खडा सवालही करण्यात आला. उपकार्यकारी अभियंता विलास शिंदे व ग्रामीण भागाचा अभियंता संबंधिता बरोबर चिरीमिरी चा व्यवहार करून गैरकायदेशीर कामे खुलेआम करतात.
विजय किंरदले यांचे शेत (शिरपूर) शिवारात आहे. एचव्हीडीएसकरिता कृषी बंब स्वखर्चाने घेण्याकरिता अर्ज केला . कामाचे निरीक्षण नाही मंजुरात नाही महावितरण कंपनी बडनेरा शाखेत ए.एल.एम या पदावर किंरदले यांची पत्नी कार्यरत आहे. अंदाज पत्रक नसताना कुणाच्या आदेशावर कामाची सुरुवात होते. उपकार्यकारी अभियंता व ग्रामीण अभियंता या दोघांनाही निलंबित करावे या प्रकरणी वरिष्ठ अधिकारी डोळेझाक करून यांनाही शह देणार काय ?
महत्वाच्या बातम्या :-
- आ.लहामटे यांच्याविरुद्ध दाखल झालेल्या गुन्ह्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचा मूक मोर्चा!
- मोठी बातमी: शरद पवार देखील करणार अन्नत्याग!
- कालचा दिवस नगरकरांसाठी दिलासादायक; जिल्ह्यात १६ मृत्यूसह ४०५ नव्या कोरोना बाधित रुग्णांची वाढ
- चंद्रपूरमध्ये पुन्हा एकदा सात दिवसांचा जनता कर्फ्यू – विजय वडेट्टीवार
- के.के.रेंज प्रश्नी शरद पवार व माझे अभिनंदन करण्याऐवजी विरोधक आमच्यावर टिका करतात- निलेश लंके
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
