Share

अमरावतीतील डॉक्टरांच्या अमूल्य योगदानासाठी पालक मंत्र्यांनीमानले आभार 

Published On: 

🕒 1 min read

अमरावती : कोरोना बाधितांवरील उपचारासाठी आरोग्य सुविधांत सातत्याने भर टाकण्यात येत आहे. कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांत अखंडित रूग्णसेवेसाठी डॉक्टरांकडून अमूल्य योगदान मिळत आहे. याबाबत विश्वास व्यक्त करताना कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने पुढेही वैद्यकीय सुविधांत भर घालण्याच्या दृष्टीने सहकार्य करावे. उपचारांबाबत खासगी वैद्यकीय यंत्रणेपुढील सर्व प्रश्न प्राधान्याने व तत्काळ सोडविण्यात येतील, असे आश्वासन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी अमरावतीकरांना दिले आहेत.

कोरोनाबाधितांवरील उपचार व आवश्यक उपाययोजनांच्या अनुषंगाने रुग्णालयचालक, तसेच डॉक्टरांची बैठकीत  बोलत होत्या. यावेळी जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांच्यासह इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अनिल रोहणकर, सचिव डॉ. आशिष साबू, डॉ. सोहेल बारी, डॉ. बख्तार, सौरभ मालाणी यांच्यासह वैद्यकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर या बैठकीला उपस्थित होते.

पालकमंत्री ठाकूर म्हणाल्या की, या कठीण काळात डॉक्टर मंडळी रुग्णसेवेसाठी अमूल्य योगदान देत आहेत. परिस्थिती गंभीर आहे. मात्र, आपणा सर्वांच्या सहकायार्ने एकजुटीने त्यावर मात करू. ऑक्सिजन, रेमडिसिव्हिर इंजेक्शन यांचा पुरेसा पुरवठा, पॅरामेडिकल स्टाफ व इतर मनुष्यबळ उपलब्ध होण्याबाबत सर्वप्रकारचे प्रयत्न केले जात आहेत. जिल्हा नियोजनातून पाचशे ऑक्सिजन सिलेंडरबाबत निधीची तरतूद केली आहे.

त्याचा बफर स्टॉकही करण्यात येईल. लक्षणे नसलेल्या रूग्णांना होम आयसोलेशनसाठी परवानगी देण्यात येत आहे. त्याशिवाय, शासकीय व खासगी रूग्णालयातील खाटांची संख्या वाढविण्याचा सातत्याने प्रयत्न होत आहे. जोखमीच्या रुग्णांवर उपचारासाठी आयसीयू सुविधा वाढविण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या :-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!