मुंबई : दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनाची काल सांगता झाली. यंदाचे पावसाळी अधिवेशन अतिशय वादळी ठरले असल्याचे आपल्याला पाहायला मिळाले. अधिवेशनच्या पहिल्याच दिवशी भाजपच्या १२ आमदारांना निलंबित करण्यात आले होते. विधानसभा अध्यक्षांना धक्काबुक्की केल्याच्या कारणावरून त्यांच्यवर हि कारवाई करण्यात आली होती.
यावर काल राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील भाष्य केले होते. अधिवेशनाची सांगता झाल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले कि, ‘शरमेनं मान खाली जाईल असं कालचं दृश्य होतं. मी नवीन आमदार आहे. पण कालचा प्रकार पाहून मी अवाक् झालो,’ असे ते म्हणाले होते. यावर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी चांगलाच टोला लगावला आहे.
‘शरमेने मान खाली घालण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. त्याच्यासाठी पण मान शरमेने खाली गेली पाहिजे. यांच्यासोबत आपण लढलो, त्यांच्याबरोबर शपथा घेतल्या, मोदींच्या प्रतिमेचा वापर केला आणि काही संबंध नाही असे म्हणून गेलात, त्यानेही मान शरमेने घातली पाहिजे,’ असा खरमरीत टोला चंद्रकांत पाटील यांनी ठाकरेंना लगावला आहे.
तसेच निलंबन केलेल्या आमदाराचा विश्वासदर्शक ठरावाचा आणि अध्यक्ष निवडणुकीतील मताचा अधिकार निलंबनामुळे जात नाही. हे एवढे का घाबरत आहेत. १७० जण आहात ना, असे सांगत चंद्रकांत पाटील यांनी विधानसभा अध्यक्ष निवडणुकीसाठी गुप्त मतदान घ्या, असे आव्हानच दिले आहे. नियमांत बदल केला तर न्यायालयातून स्थगिती आणू, असा इशाराही यावेळी त्यांनी दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- डॉ. भागवत कराड यांची दुसऱ्यांदा लॉटरी? केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता
- राष्ट्रवादीच्या नेत्याचे शिवसेनेच्या मंत्र्यांवर गंभीर आरोप, लाचलुचपत विभागाकडे केली तक्रार
- विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात भाजपने नेमकं काय कमावलं आणि काय गमावलं ?
- पालखीस परवानगी नाकारली, महाराजांचा वारकर्यांसहित आत्मदहनाचा इशारा!
- अधिवेशन संपले तरीही अडचणी सुरूच; मुख्यमंत्र्यांच्या समोर आता नवे आव्हान काय असणार ?


