औरंगाबाद : भारतीय जनता पक्षाचे निष्ठावाण कार्यकर्ते म्हणून ओळख असलेले खासदार डॉ. भागवत कराड यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता वाढली आहे. गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत चर्चा सुरू आहे. यात सर्वात आधी ज्येष्ठ नेते नारायण राणे यांचे नाव होते. मात्र, त्याच बरोबर आता डॉ. कराड यांचेही नाव चर्चेत आहे.
या आधी देखील महाराष्ट्रातून अनपेक्षितपणे राज्यसभेसाठी डॉ. कराड यांची वर्णी लागली होती. महाराष्ट्रातील ओबीसी आणि मराठा समाज सध्या नाराज आहे. त्यात राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्याने त्यांची कोंडी करण्यासाठी या दोन नावांचा समावेश मंत्रिमंडळात करण्याचा भाजपचा प्रयत्न आहेत. डॉ. कराड हे ओबीसीचा मोठा चेहरा नसले तरी गोपीनाथ मुंडे यांचे कार्यकर्ते आहेत. त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले तर एका दगडात दोन पक्षी मारण्याची संधी भाजपला मिळेल. त्यामुळे त्यांचे नाव आघाडीवर असल्याचे बोलले जाते.
केंद्रीय मंत्रिमंळडात जालन्याचे खासदार रावसाहेब दानवे यांचा समावेश आहे. मात्र, ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूनंतर मराठवाड्याचे केंद्रातील स्थान कमी झाले आहे. त्यात डॉ. कराड यांची मंत्रिमंडळात वर्णी लागली तर मराठवाड्याला पुन्हा एकदा ओबीसी नेतृत्त्व मिळेल. सध्यातरी कराड यांचे नाव आघाडीवर असल्याची चर्चा आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘जे तीस वर्षात झालं नाही ते आता काय होणार ?’; भाजपच्या युतीबाबत उद्धव ठाकरेंच भाष्य
- राष्ट्रवादीच्या नेत्याचे शिवसेनेच्या मंत्र्यांवर गंभीर आरोप, लाचलुचपत विभागाकडे केली तक्रार
- विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात भाजपने नेमकं काय कमावलं आणि काय गमावलं ?
- पालखीस परवानगी नाकारली, महाराजांचा वारकर्यांसहित आत्मदहनाचा इशारा!
- अधिवेशन संपले तरीही अडचणी सुरूच; मुख्यमंत्र्यांच्या समोर आता नवे आव्हान काय असणार ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

