🕒 1 min read
मुंबई : एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याच्या प्रमुख मागणीसाठी एसटी कर्मचारी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करत आहेत. एसटी कर्मचारी संपावर असताना त्यांच्या आंदोलनाला भाजपने जाहीर पाठिंबा दिला आहे. भाजप आणि एसटी कर्मचाऱ्यांनी परिवहन मंत्री अनिल पबर यांना या मुद्द्यावरुन वेठीस धरलं आहे. एसटी कर्मचारी अनिल परब यांच्यावर आक्रमक झाले आहेत. त्यावर आता अनिल परब यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
एसटी कामगारांच्या 28 युनियन आहेत. त्या सर्वांच्या प्रतिनिधींसोबत बसून सरकारनं कामगारांच्या अनेक मागण्या मार्गी लावल्या आहेत. विलिनीकरणाच्या व्यतिरिक्त आणखीही कुठले मुद्दे असतील तर त्यावरही चर्चा करण्यासाठी आम्ही तयार आहोत. पण प्रत्येकाशी चर्चा शक्य नाही. त्यामुळं चर्चा नेमकी कुणाशी करायची हे कामगारांनीच सांगावं, असं अनिल परब म्हणाले आहेत.
एसटी कामगारांचा संप १५ दिवसांनंतरही सुरूच आहे. उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीनुसार, आज कामगारांचे प्रतिनिधी मुख्य सचिवांच्या समितीसमोर आपलं म्हणणं मांडणार आहेत. एसटी कामगारांचा संप १५ दिवसांनंतरही सुरूच आहे. उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीनुसार, आज कामगारांचे प्रतिनिधी मुख्य सचिवांच्या समितीसमोर आपलं म्हणणं मांडणार आहेत.
दरम्यान, विलिनीकरणा व्यतिरिक्त काही प्रश्न असतील तर सरकारची दारं चर्चेसाठी खुली आहेत. सध्या कामगारांचं नेतृत्व करणारे गोपीचंद पडळकर व सदाभाऊ खोत यांच्याशी मी दोन वेळा चर्चा केली. सरकारचा दोन्ही वेळचा प्रस्ताव त्यांच्यासमोर ठेवला. कामगारांशी चर्चा करून तुम्हाला कळवतो असं सांगून ते गेले, पण पुढं काहीच झालेलं नाही. कदाचित कामगार त्यांचंही ऐकत नसावेत किंवा ते कामगारांना समजावण्यात कमी पडत असतील, असंही अनिल परब म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- ‘उद्धव ठाकरे हे पार्टटाईम मुख्यमंत्री, राज्याला फडणवीसांसारखा फुलटाईम मुख्यमंत्री हवा’
- शिवसेनेनं सत्तेसाठी ‘हिंदुत्ववादी’ भूमिका बासनात गुंडाळून ठेवलीये- प्रविण दरेकर
- ‘आंदोलनाचा आज सातवा दिवस, या बिनकाळजाच्या सरकारला कधी जाग येणार?’
- नोव्हेंबर महिन्यात पुढील सहा दिवस राहणार बँक बंद; जाणून घ्या
- ठाकरे सरकारकडून प्राध्यापक भरतीचा निर्णय जारी; मानधनातही वाढ!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
