Share

शिवसेनेनं सत्तेसाठी ‘हिंदुत्ववादी’ भूमिका बासनात गुंडाळून ठेवलीये- प्रविण दरेकर

Published On: 

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. एसटी महामंडळचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याच्या प्रमुख मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी एसटी बंद आंदोलन केले आहे. राज्य सरकारविरोधात एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या आंदोलनामध्ये भाजपने जाहीर पाठिंबा दर्शवला आहे. दिवसेंदिवस हा मुद्दा अधिकच चिघळत चालला आहे. या सर्व प्रकरणावरुन  विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे.

शिवसेनेने सत्तेसाठी सर्व बासनात गुंडाळून ठेवलीये, असं म्हणत प्रविण दरेकरांनी शिवसेनेवर शरसंधान साधलं आहे. राज्यसरकार या कर्मचाऱ्यांच्या मागण्या तातडीने का पूर्ण करत नाही? असा सवालही विरोधक विचारत आहेत. ‘महाराष्ट्रात अलिकडच्या काळात राज्यव्यापी आंदोलन म्हणून एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाकडे पाहता येईल. एसटीच्या या संप आणि आंदोलनाबाबत प्रवाशांनीही कोणताच आक्षेप घेतलेला नाही. कारण प्रवाशांनाही सेवा देणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संवेदना, भावना माहिती आहेत’, असं प्रविण दरेकर म्हणाले आहेत.

एसटी कर्मचार्‍यांविषयी राज्यसरकारची भावना सहानुभूती आणि संवेदनशील दिसत नाही. या सरकारला अजून किती कर्मचाऱ्यांचे बळी हवे आहेत, हे त्यांनी सांगावं. आता जर कर्मचार्‍यांना न्याय दिला नाही तर त्यांच्या भावनांचा उद्रेक होऊन परिस्थिती हाताबाहेर जाईल आणि याला संपूर्णतः राज्यसरकार जबाबदार असेल, असे सूचक वक्तव्य प्रविण दरेकरांनी केले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!