🕒 1 min read
मुंबई : राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी संप पुकारला आहे. मुंबईतील आझाद मैदानावर या कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनात रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत, भाजपा आमदार गोपीचंद पडळकर हे सहभागी झाले आहेत. जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत इथून हालणार नाही. असा पावित्रा सदाभाऊंनी घेतला आहे. याबाबत सदाभाऊंनी ट्विट करत महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.
सदाभाऊ खोत ट्विट करत म्हणाले, लढा विलगीकरणाचा, धडक मोर्चा एसटी कामगाराच्या या आंदोलनाच्या सातव्या दिवशी आझाद मैदान वर एसटी कर्मचारी कामगार वर्गाने महा विकास आघाडी विरुद्ध काळे झेंडे दाखवून निदर्शने केली. या बिनकाळजाच्या सरकारला कधी जाग येणार ? परंतु आम्ही आमच्या निर्णयावर ठाम आहोत. असे सदाभाऊ खोत म्हणाले आहेत.
लढा विलगीकरणाचा, धडक मोर्चा एसटी कामगाराच्या या आंदोलनाच्या सातव्या दिवशी आझाद मैदान वर एसटी कर्मचारी कामगार वर्गाने महा विकास आघाडी विरुद्ध काळे झेंडे दाखवून निदर्शने केली.
या बिनकाळजाच्या सरकारला कधी जाग येणार ? परंतु आम्ही आमच्या निर्णयावर ठाम आहोत. pic.twitter.com/NdRwZdKJ1V
— Sadabhau Khot (@Sadabhau_khot) November 16, 2021
एसटी कर्मचाऱ्यांच्या बहुतांश मागण्या राज्य सरकारने पूर्ण केल्या असल्या तरी विलीनीकरणाच्या मागणीसाठी मात्र कर्मचारी अडून बसले आहेत. या संपावर तोडगा काढण्यासाठीच राज्य सरकारने एक समिती देखील नेमली आहे, मात्र या समितीवर एसटी संघटनांनी आक्षेप नोंदवला आहे. या समितीवर आम्हाला विश्वास नाही. त्यामुळे निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात यावी, अशी विनंती संघटनांनी उच्च न्यायालयात सोमवारी केली होती.
महत्वाच्या बातम्या
- ‘हितसंबंध दुखावलेल्या काही पापण्या सोडल्या तर सगळं जग मोदींचे कौतुक करतंय’
- १०० कोटी लसीकरणानंतर पंतप्रधान मोदी आज करणार ‘मन की बात’
- पुन्हा सत्तेत येणार नाही, या भीतीपोटी पटोलेंनी ‘ते’ वक्तव्य केले-संजय कुटे
- बाबरी तोडली तेव्हा आम्ही काखा वर नाही केल्या, तुमच्यासारखं पळून नाही गेलो; राऊतांचा भाजपला टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
