मुंबई: उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून सहायक प्राध्यापक पदाच्या २०८८ तर ३७० प्राचार्य पदांच्या भरतीसाठी मान्यता देणारा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. मात्र भरतीसाठी प्रक्रिया सुरु करण्यापूर्वी अतिरिक्त ठरलेल्या प्राध्यापकाचं समायोजन करण्याच्या सूचना राज्य सरकारच्यावतीनं देण्यात आल्या आहेत. त्याच सोबत राज्य सरकारने तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
प्राध्यापक भरतीसाठी सेट नेट पात्रताधारक आणि तासिका तत्त्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांनी गेल्या काही महिन्यांपासून आंदोलन केलं होतं. आंदोलकांच्या मागणीला प्रतिसाद देत तासिका तत्ववरील परध्यापकांच्या मानधनात वाढ करण्यात आली आहे. आता २०८८ पदांच्या भरतीसाठी मान्यता देणारा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे त्याच सोबत भरतीची पुढील प्रक्रिया काय असणार हे देखील स्पष्ट करण्यात आले आहे.
अकृषी विद्यापीठ संलग्नित अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील पदभरती करताना विद्यापीठ अधिनियमातील विहीत तरतूदींचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. सहायक प्राध्यापक पदावर निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती सन २०२२ – २०२३ हे शैक्षणिक वर्ष सुरू होण्याच्या दिनांकापासून करण्यात यावी. तसेच वेतन सन २०२२ – २०२३ या शैक्षणिक वर्षाच्या प्रथम दिनांकापासून सुरू करण्यात यावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
- पत्रलेखाने लग्नाच्या ओढणीवर राजकुमारसाठी लिहिला ‘हा’ खास संदेश
- १०० कोटी लसीकरणानंतर पंतप्रधान मोदी आज करणार ‘मन की बात’
- ‘पीटलाईन जालन्याला हलवून औरंगाबादकरांच्या जखमेवर मीठ चोळू नका.. ‘आ. सतिश चव्हाणांचा रावसाहेब दानवेंना टोला!
- बाबरी तोडली तेव्हा आम्ही काखा वर नाही केल्या, तुमच्यासारखं पळून नाही गेलो; राऊतांचा भाजपला टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
