Share

‘उद्धव ठाकरे हे पार्टटाईम मुख्यमंत्री, राज्याला फडणवीसांसारखा फुलटाईम मुख्यमंत्री हवा’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मुंबईत भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीदरम्यान उद्धव ठाकरे हे पार्टटाईम मुख्यमंत्री आहेत. ते कायम काम करतात हे सर्वांना माहीत आहे. राज्याला पार्टटाईम मुख्यमंत्र्याची गरज नाही. देवेंद्र फडणवीसांसारखा फुलटाईम मुख्यमंत्रीच राज्याला हवा, असे वक्तव्य भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि महाराष्ट्र प्रभारी सी. टी. रवी यांनी केले आहे.

यावेळी बोलतांना ते म्हणाले की,’आजचा मुख्यमंत्री पार्टटाईम आहे. फुलटाईम नाही. राज्यात फडणवीसांराखा फुलटाईम मुख्यमंत्री हवा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कधी उठतात, कधी झोपतात, कधी काम करतात जनतेला सर्व माहीत आहे. या सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकारच नाही. राजकारणाचं गुन्हेगारीकरण यांच्या हातचा मळ झाला आहे’, असे ते म्हणाले.

दरम्यान, पुढे बोलत असतांना ते म्हणाले की,’बाळासाहेब ठाकरेंच्या भूमीत हिंदूंवर अत्याचार होत आहेत. रोज वर्तमानपत्रात अत्याचाराच्या बातम्या येत आहेत. हिंदूंना रोज अपमानित व्हावं लागत आहे. काँग्रेसचे नेते सलमान खुर्शीद हिंदूंना नावं ठेवत आहे. रशीद अल्वीही हिंदूंवर टीका करत आहे. त्यांच्या सारखी शिवसेना आहे. महाराष्ट्र विकास आघाडी सरकार भ्रष्टाचारांचा अड्डा बनला आहे. हे सरकार महाविकास आघाडी नाही तर महाराष्ट्र विनाश आघाडी आहे. जो पक्ष हिंदू रक्षण करण्यासाठी बांधिल होता, तो पक्ष आता परिवार पार्टी झाला आहे. एक बारामती, दुसरी इटली आणि तिसरी ठाकरे कुटुंबाची पार्टी झाली आहे. केवळ घराणेशाही पुढे नेण्यासाठीच काम होत आहे.’

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!