🕒 1 min read
मुंबई : दिवाळीच्या सुट्यानंतर आता नोव्हेंबरमध्ये पुढील काही दिवस एकूण सहा दिवस बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे जर तुम्ही तुमची बँके संबंधी कामे पुढे ढकलणार असाल तर त्याधीच सुट्यांची यादी जाणून घ्या. नाही तर यामुळे तुमची गैरसोय होऊ शकते.
सुट्ट्यांची यादी –
19 नोव्हेंबरः गुरुनानक जयंती आणि कार्तिक पौर्णिमा आहे. त्यामुळे आइजोल, बेलापूर, भोपाळ, चंदीगढ, डेहराडून, हैदराबाद, जयपूर, जम्मू, कानपूर, कोलकाता, लखनौ, मुंबई, नागपूर, दिल्ली, रायपूर, रांची, शिमला आणि श्रीनगरमधील बँका बंद राहतील. महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी बँका बंद राहतील.
21 नोव्हेंबरः या दिवशी रविवार आहे. त्यामुळे बँकांना सुट्टी.
22 नोव्हेंबरः कणकदास जयंती आहे. त्यामुळे बेंगळुरूत बँक बंद. त्यांची शाखा महाराष्ट्रात असेल, तर तीही बंद राहील.
23 नोव्हेंबरः या दिवशी विशेषतः शिलाँगमधील बँका बंद राहतील. सेंग कुट्सनेमनिमित्त बँकांना सुट्टी राहील. त्यांची शाखा महाराष्ट्रात असेल, तर ती बंद असेल.
28 नोव्हेंबरः या दिवशी रविवार आहे. त्यामुळे बँकांना सुट्टी.
बँका बंद असल्याने या वरील सुट्ट्याच्या नियोजनानुसारच तुम्ही बँकाची कामे पूर्ण करा. अन्यथा तुमची महत्वाची कामे रखडण्याची शक्यता आहे. बँक बंदमुळे अनेक ग्राहकांचे KYC चे काम रखडू शकते तसेच एटीएममध्ये पैसे संपल्यास येथे देखील अडचणीचा सामना करावा लागू शकते.
महत्वाच्या बातम्या
- ‘हितसंबंध दुखावलेल्या काही पापण्या सोडल्या तर सगळं जग मोदींचे कौतुक करतंय’
- १०० कोटी लसीकरणानंतर पंतप्रधान मोदी आज करणार ‘मन की बात’
- ‘पीटलाईन जालन्याला हलवून औरंगाबादकरांच्या जखमेवर मीठ चोळू नका.. ‘आ. सतिश चव्हाणांचा रावसाहेब दानवेंना टोला!
- बाबरी तोडली तेव्हा आम्ही काखा वर नाही केल्या, तुमच्यासारखं पळून नाही गेलो; राऊतांचा भाजपला टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
