Share

“…मग नंतर तुमच्या भूमिकेत बदल का झाला?”, अतुल भातखळकरांचा शरद पवारांना सवाल

Published On: 

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींची (PM Narendra Modi) भेट घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषेदेत पवारांनी अनेक मुद्द्यावर भाष्य केले आहे. तसेच यावेळी राज ठाकरेंसंदर्भांत बोलतांना ‘राज ठाकरे आधी मोदींच्या विरोधात होते, आता ते बदलले आहेत. पण राज ठाकेरेंच्या बोलण्याकडे मी लक्ष देत नाही’, असे पवार म्हणाले. दरम्यान, पवारांच्या या वक्तव्यावर आता भाजप नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी टीका केली आहे.

यासंदर्भात अतुल भातखळकर यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,‘राज ठाकरे आधी भाजपविरोधात होते, त्यांच्या भाषणात बदल का झाला याचं कारण कळलं नाही, असे शरद पवार म्हणाले. आधी तुम्ही सोनिया गांधींच्या विदेशी मुद्द्यावर काँग्रेसच्या विरोधात होतात, नंतर तुमच्या भूमिकेत बदल का झाला याचं कारण कधीच कळलं नाही’, असे भातखळकर म्हणाले.

दरम्यान, ‘संजय राऊत यांच्या मालकीची केवळ अर्धा एकर जमीन अलिबागमध्ये आहे. अशा क्षुल्लक कारणासाठी एका ज्येष्ठ पत्रकारावर केंद्रीय तपास यंत्रणांनी कारवाई करणे योग्य नाही’, असेही काल पत्रकारांशी संवाद साधत असतांना शरद पवार म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!