मुंबई : आज (७ एप्रिल) उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रसिद्ध अभिनेत्री आसावरी जोशी आणि अभिनेत्री स्वागता शाह यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. दरम्यान, यावेळी बोलत असतांना अजित पवार यांनी मोठे वक्तव्य केले आहे.
यावेळी बोलत असतांना अजित पवार म्हणाले की,‘राज्यात कोरोनाचे सावट असल्यामुळे अनेक गर्दीच्या कार्यक्रमांवर निर्बंध लावण्यात आले होते. कोरोना नियंत्रणात आल्यानंतर आता राज्यात नियमांमध्ये मोठी शिथिलता देण्यात आली आहे. तरीही सर्वांनी आपली काळजी घ्यावी,’ असे आवाहन यावेळी पवारांनी केले.
दरम्यान, मावळ विधानसभेचे आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकाराने भाजपमधील अनेक मान्यवरांनी पक्षात प्रवेश केला. यावर बोलत असतांना अजित पवार म्हणाले की, ‘मागील ३० वर्षे राजकीय क्षेत्रात काम करत असताना मावळ मतदारसंघात पक्षाला विजय मिळवता आला नाही. परंतु, सुनील शेळके यांच्यामुळे पक्षाला या जागेवर प्रचंड मतांनी विजय मिळवता आला. जनतेने आपल्याला मत देऊन त्यांची जबाबदारी पूर्ण केली. आता आपल्याला विकास कामे करून आपली जबाबदारी पार पाडायची आहे. सर्वांनी मिळून तालुक्याचा विकास करण्याचा प्रयत्न करूया,’ असे पवार म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- “मातृभूमीचा लिलाव करून बाजार मांडणारे महात्मा किरीट सोमय्या”; राऊतांचा टोला
- “पैसे योग्य ठिकाणी गुजरातला तर…”, अमोल मिटकरींचा किरीट सोमय्यांवर निशाणा
- नगरसेवक वसंत मोरेंचा मनसेला रामराम? पक्षाच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमधून लेफ्ट!
- अजित पवारांच्या उपस्थितीत अभिनेत्री आसावरी जोशी आणि स्वागता शाह यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
- काय आहे किणी खून प्रकरण? ज्यावरुन राज ठाकरेंना आजही केलं जातेय टार्गेट


