Share

चक्क पोलीस अधिकाऱ्याच्या घरी चोरी, सव्वा लाखांचा ऐवज लंपास

Published On: 

अकोला : अकोल्यात चोरट्यांनी थेट पोलिसांनाच आव्हान दिले आहे. कौलखेड येथील खेतान नगरमधील रहिवासी पोलीस उपनिरीक्षक हे कुटुंबासह पातूर येथे गेले होते. घरी कोणी नसल्याची संधी साधत दाराची कडी तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला आणि दागदागिने लंपास केले. या प्रकारामुळे परिसरात चांगलीच चर्चा होत आहे.

मिळालेल्या माहितीनूसार, गणेश जानकीराम कोथळकर हे मंगरूळपीर(जि.वाशीम) पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. ते रजेवर असल्याने घरीच आहेत. २४ एप्रिलला दुपारच्या सुमारास घराला कुलूप लावून ते कुटुंबासह मुळ गावी पातूर येथे गेले होते. २८ एप्रिलला दुपारी एक वाजता ते घरी परतले असता त्यांना ग्रील गेटचे कुलूप कोंडा तुटलेला दिसला.

घरात जावून पाहतात तर बेडरुममधील लाकडी कपाट उघडे दिसले व त्यातील सामान पलंगावर अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले. त्यांच्या कपाटातील सोन्याचे दागिने ज्यामध्ये पाच ग्रॅम सोन्याची अंगठी, राणीहार २६ ग्रॅम, पाच हजार रुपये किमतींची घड्याळ, असा १ लाख १९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला. याप्रकरणी कोथळकर यांच्या तक्रारीवरून खदान पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!