Share

‘राष्ट्रवादीचा ‘तो’ आमदार अजितदादांचे ऐकत नसेल तर आम्हीच त्याचा बंदोबस्त करतो’

Published On: 

पुणे : राज्यात २०१९ विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर भिन्न विचारसरणी असलेले काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांनी एकत्र येऊन महाविकास आघाडी सरकारची स्थापना केली. दरम्यान, महाविकास आघाडी सरकारमधील धुसफूस अनेकदा समोर आली आहे. फोडाफोडीच्या राजकारणावरून याआधी शिवसेनेनं राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाहीर नाराजी व्यक्त केली होती.

असाच एकप्रकारे खेड (राजगुरूनगर) येथे घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते यांनी पैशाच्या आणि दहशतीच्या जोरावर पंचायत समितीचे सदस्य आपल्या बाजूने करून घेतले होते, असा आरोप करत स्थानिक शिवसेना नेते हे तीव्र नाराज होते. आता हे प्रकरण वाढलं असून खुद्द शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे. त्यावरून आता शिवसेना खासदार यांनी आक्रमक भूमिका घेत दिलीप मोहिते यांना गंभीर इशारा दिला आहे.

जे खेडला घडलं त्याचं खापर आम्ही शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्यावर फोडणार नाही. त्यांचे आमचे सरकारमधील संबंध चांगले आहेत, चांगले राहतील. खेडचे विद्यमान आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्यामुळेच तालुक्यात आघाडीची बिघाडी झाली आहे. पंचायत समितीच्या जागेवरून हे रेटून नेत आहेत, त्यांना माज आलाय असंच म्हणावं लागेल. थोडीफार सत्ता आहे म्हणून माज करू नका, शिवसेना उत्तर देईल, असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.

तर, मी जे काही बोलत आहे, ते मानाचं सांगत नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करूनच मी बोलत आहे. महाराष्ट्रात चांगलं सुरू असताना पुण्यात कुरबुरी करणारे लोक असतील तर अजित पवारांनी त्यांचा बंदोबस्त करावा. जर अजित पवाराचं ऐकत नसेल तर आम्हाला परवानगी द्यावी, आम्ही त्यांचा बंदोबस्त करू, असा इशाराही त्यांनी दिला.

काय आहे प्रकरण ?

खेड पंचायत समितीत शिवसेनेची सत्ता आहे. त्यांचे 8 सदस्य आहेत. तर कॉंग्रेस, भाजप असा प्रत्येकी एक मिळून 14 पैकी 10 सदस्यांचे बलाबल आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे 4 सदस्य आहेत. सभापतीपद सर्वसाधारण वर्गासाठी आहे. परंतु त्यातच सदस्यांनी सभापती भगवान पोखरकर यांच्या विरोधात बंड केले आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!