मुंबई: माजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंजाब विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यात त्यांनी मोदी सरकारवर चांगलाच निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी लडाखमध्ये प्रत्यक्ष ताबा रेषेवर चीनची घुसखोरी दडपण्याचा प्रयत्न मोदी सरकार करत असल्याचा आरोपही केला. यावरूनच भाजप नेते अतुल भातखळकर यांनी ट्वीट करत प्रत्युत्तर दिले आहे.
“एवढा निर्भीडपणा पंतप्रधान असताना दाखवला असता तर २६/११ झाले नसते, पाकिस्तानी पंतप्रधान तुम्हाला देहाती औरत म्हणाला नसता, चीन भारतीय सीमांमध्ये खोलवर घुसला नसता…”, अशी खोचक टीका अतुल भातखळकर यांनी केली आहे. दरम्यान २००८ साली जेव्हा मुंबईवर २६/११ हल्ला झाला, त्यावेळी मनमोहन सिंह पंतप्रधान होते. तर पाकिस्तानचे पंतप्रधान युसुफ रझा गिलानी होते.
एवढा निर्भीड पणा पंतप्रधान असताना दाखवला असता तर 26/11 झाले नसते, पाकिस्तानी पंतप्रधान तुम्हाला देहाती औरत म्हणाला नसता, चीन भारतीय सीमांमध्ये खोलवर घुसला नसता… pic.twitter.com/k9n9PLZkZl
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) February 18, 2022
नेमके मनमोहन सिंह काय म्हणाले?
लडाखमध्ये प्रत्यक्ष ताबा रेषेवर चीनची घुसखोरी दडपण्याचा प्रयत्न मोदी सरकार करत आहे. तसेच नेत्यांना बळजबरीने मिठी मारून, झुल्यांवर झुलवून किंवा बिर्याणी खाऊन परराष्ट्र संबंध सुधारत नाहीत, हे आता पंतप्रधान मोदींना एव्हाना समजले असेल. त्यामुळे सत्य कधी ना कधी बाहेर येते. मोठमोठय़ा गप्पा मारणे सोपे असते, मात्र त्या प्रत्यक्षात आणणे कठीण असते, असा टोलाही मनमोहन सिंह यांनी लगावला आहे.
पंजाबमधील ११७ जागांसाठी रविवारी मतदान होणार आहे. याच पार्श्वभूमीवर मनमोहन सिंग यांनी चित्रफीत प्रसिद्ध करत मतदारांना अप्रत्यक्षपणे संदेश दिला आहे. यावेळी त्यांनी “एकीकडे जनतेला महागाई आणि बेरोजगारीच्या समस्या भेडसावत आहेत, तर दुसरीकडे गेल्या साडेसात वर्षांपासून सत्तेत असलेले विद्यमान सरकार आपल्या चुका मान्य करून त्या सुधारण्याऐवजी पंतप्रधान नेहरूंना दोष देत आहे.”, अशा शब्दांत मोदींना सुनावले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Breaking News : अहमदाबाद बॉम्बस्फोट प्रकरणी ३८ जणांना फाशी तर ११ जणांना आजन्म कारावासाची शिक्षा
- खा. गिरीष बापट यांच्या घराबाहेर काँग्रेस कमिटीच्या वतीने “माफी मागो” आंदोलन
- “…अन् रश्मी ठाकरेंच्या डोळ्यात टचकन पाणी आले”
- शिवजयंतीनिमित्त रॅली तसेच डी.जे वर बंदी; नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई
- रणजी ट्रॉफी: सरफराज खानची शानदार १५० धावांची खेळी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

