Share

“…अन् रश्मी ठाकरेंच्या डोळ्यात टचकन पाणी आले”

Published On: 

मुंबई: शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुधीर जोशी यांचे काल (१७ फेब्रुवारी)निधन झाले. त्यांनी वयाच्या ९३ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर मुंबईत शासकीय इतमामात शिवाजी पार्क परिसरात अंत्यसंस्कार होणार आहेत. यावेळी पार्थिवाचं अंतिम दर्शन घेत असताना रश्मी ठाकरे भावूक झाल्या, अन् रश्मी ठाकरेंच्या डोळ्यात टचकन पाणी आले. (tears in Rashmi Thackeray eyes) यावेळी त्यांनी सुधीर जोशी यांच्या घरच्यांना आधार देखील दिला.

दरम्यान सुधीर जोशी यांचं निधन झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त केला. तसेच राज्यातील अनेक नेत्यांनीही शोक व्यक्त केला. सुधीर जोशी यांनी शिवसेनेसाठी अत्यंत महत्त्वाचे काम केले होते. त्यांच्याकडे शिवसेनेचा एक आक्रमक चेहरा म्हणून पाहिलं जात होतं. त्यांच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. यावेळी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे तसेच शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी देखील उपस्थिती लावली.

दरम्यान कोरोनाची लागण झाल्याने त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यातून बरे वाटत असताना त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. मात्र अचानक तब्येत ढासळल्याने त्यांचे काल निधन झाले.१९७२ मध्ये ते मुंबईचे महापौर राहिले आहेत.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!