🕒 1 min read
गुजरात : गुजरातमधील (Gujrat) अहमदाबादमध्ये (Ahmedabad) २००८ साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोट (Bomb Blast) प्रकरणी आज सत्र न्यायालयाचे (Court) विशेष न्यायाधीश ए. आर. पटेल (A.R.Patel) यांनी ४९ दोषींपैकी ३८ जणांना फाशीची शिक्षा दिली असून ११ जणांना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
यापूर्वी २ फेब्रुवारीला याप्रकरणी निकाल येणार होता. पण न्यायमूर्ती ए आर पटेल यांना कोरोनाची लागण झाली. त्यामुळे ८ फेब्रुवारीपर्यंत तारीख पुढे ढकलण्यात आली होती. विशेष कोर्टाने दोषींच्या शिक्षेवरील युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर निकाल राखीव ठेवला होता. सरकारी वकिलांनी सर्व दोषींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती. तर दोषींच्या वकिलांकडून कमीत कमी शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली होती.
दरम्यान, २६ जुलै २००८ रोजी अहमदाबादमध्ये संध्याकाळी ६.४५ वाजता पहिला बॉम्बस्फोट झाला होता. यानंतर ७० मिनिटे आणखी २० बॉम्बस्फोट झाले. या स्फोटात ५६ लोक ठार झाले आणि २०० हून अधिक जखमी झाले. २००२ च्या गोध्रा हत्याकांडाचा बदला घेण्यासाठी इंडियन मुजाहिद्दीनने हे बॉम्बस्फोट घडवून आणले होते. या स्फोटांमध्ये इंडियन मुजाहिदीन (IM) आणि स्टुडंट्स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया (SIMI) या दहशतवाद्यांचा हात होता. स्फोटांच्या ५ मिनिटांपूर्वी दहशतवाद्यांनी वृत्तसंस्थांना एक मेलही पाठवला होता, ज्यामध्ये ‘तुम्हाला जे हवे ते करा, थांबू शकता तर थांबवून दाखवा,’ असे लिहिले होते.
महत्वाच्या बातम्या :
- “प्रत्येक कार्यकर्ता आमच्यासाठी व्हीआयपीच…”, रुपाली चाकणकरांनी सांगितला ‘तो’ किस्सा
- राहुल गांधी आणि नवज्योतसिंह सिद्धू यांची प्यारवाली झप्पी देणार का पंजाब राजकारणाला नवीन वळण?
- ‘नारायण राणेंवर किरीट सोमय्यांनी केलेले आरोप खरे मानायचे का’; दीपक केसरकरांचा सवाल
- “महागाई कमी करायची असेल तर भाजपला हरवा कारण जिंकली तर…”, अतुल लोंढेंचा इशारा
- शिवजयंतीनिमित्त रॅली तसेच डी.जे वर बंदी; नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
