मुंबई: मुंबईकडून रणजी खेळणाऱ्या सरफराज खानने पहिल्याच सामन्यात सौराष्ट्रविरुद्ध शतक झळकावले आहे. गेल्या रणजी हंगामात सरफराजने एक शतक, एक द्विशतक, एक त्रिशतक झळकावले होते. आता पहिल्याच सामन्यात त्याने नाबाद शतक झळकावून आपली प्रतिभा दाखवून दिली आहे. मुंबईच्या संघाने अवघ्या ४४ धावांत तीन विकेट गमावल्या असताना सरफराजचे आणि अजिंक्य रहाणे फलंदाजीसाठी उतरले. सर्फराजने रहाणेसोबत २०० हून अधिक धावांची भागीदारी करून संघाला मजबूत स्थितीत आणले.
सरफराज खानने २९९ चेंडूंत १९ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने १५० धावा केल्या. एवढेच नाही तर कसोटी क्रिकेटमधील खराब कामगिरीमुळे टीकेला सामोरे जाणाऱ्या अजिंक्य रहाणेनेही पुनरागमन करताना शतक झळकावले. रहाणेनेही सलामी देत २५० चेंडूंत १४ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने १०८ धावा केल्या.
रणजीच्या गेल्या हंगामात सरफराजने पहिल्या सामन्यात ८ आणि ७१ धावा केल्या होत्या. दुसऱ्या सामन्यात त्याच्या बॅटमधून केवळ ३६ धावा आल्या. मात्र त्यानंतर त्याने नाबाद ३०१ धावांची खेळी केली. सरफराज एवढ्यावरच थांबला नाही, त्याने पुढच्या सामन्यात नाबाद २२६ धावा केल्या. त्यानंतर ७८ आणि २५ धावांच्या खेळीनंतर त्याने १७७ धावा केल्या. आता सौराष्ट्रविरुद्ध शतक झळकावून सरफराजने प्रथम श्रेणीतील आपला विक्रम नेहमीच भक्कम ठेवला आहे.
महत्वाच्या बातम्या
- “महागाई कमी करायची असेल तर भाजपला हरवा कारण जिंकली तर…”, अतुल लोंढेंचा इशारा
- ‘नारायण राणेंवर किरीट सोमय्यांनी केलेले आरोप खरे मानायचे का’; दीपक केसरकरांचा सवाल
- राहुल गांधी आणि नवज्योतसिंह सिद्धू यांची प्यारवाली झप्पी देणार का पंजाब राजकारणाला नवीन वळण?
- ते १९ बंगले उद्धव ठाकरे आणि वायकर परिवाराचेच’; किरीट सोमय्यांचा दावा
- “प्रत्येक कार्यकर्ता आमच्यासाठी व्हीआयपीच…”, रुपाली चाकणकरांनी सांगितला ‘तो’ किस्सा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

