पुणे: दरवर्षी मोठ्या उत्साहात श्री शिवछत्रपती महाराजांची जयंती साजरी केली जाते.मात्र,यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने दिलेल्या नियमांनुसार साध्या पद्धतीने साजरी करुन प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन यवत पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक नारायण पवार यांनी केले.
यवत पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या गावातील पोलिस पाटील व शिवजयंती उत्सव मंडळांची बैठक ( ता.१७ ) गुरवारी यवत पोलिस स्टेशन येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी पोलिस निरीक्षक पवार यांनी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
नारायण पवार म्हणाले, कोठेही मिरवणूकीला परवानगी नसुन शिवप्रतिमा तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे जागेवरच पुजन करुन आरोग्य विषयक उपक्रम राबवावेत. तसेच शिवज्योत घेऊन येण्यासाठी २०० लोकांना तर उत्सवासाठी ५०० लोकांच्या परवानगी असुन सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या प्रमाणात गर्दी करू नये.
महत्वाच्या बातम्या:
“महागाई कमी करायची असेल तर भाजपला हरवा कारण जिंकली तर…”, अतुल लोंढेंचा इशारा
‘नारायण राणेंवर किरीट सोमय्यांनी केलेले आरोप खरे मानायचे का’; दीपक केसरकरांचा सवाल
राहुल गांधी आणि नवज्योतसिंह सिद्धू यांची प्यारवाली झप्पी देणार का पंजाब राजकारणाला नवीन वळण?
ते १९ बंगले उद्धव ठाकरे आणि वायकर परिवाराचेच’; किरीट सोमय्यांचा दावा


