Share

…तर ५ मिनिटांत शेतकरी आंदोलनावर तोडगा निघेल : संजय राऊत

Published On: 

नवी दिल्ली : कृषी कायद्यांविरोधात राजधानी दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला आता ६० दिवस उलटून गेलेत. केंद्रातील मोदी सरकारकडून लागू करण्यात आलेल्या कृषी कायद्यांविरोधात २६ नोव्हेंबरपासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसलेत. या शेतकऱ्यांत विशेषत: पंजाब आणि हरीयाणातल्या शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे.

प्रजासत्ताक दिनी अवघ्या जगाचे लक्ष भारताकडे लागले असताना शेतकरी आंदोलनाच्या नावाखाली समाजकंटकांनी राजधानी दिल्लीमध्ये धुडगूस घातला आणि या आंदोलनाला गालबोट लागले. याच पार्श्वभूमीवर आज दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक पार पडली. आता प्रत्यक्ष मोदिंनी यामध्ये हस्तक्षेप केल्यामुळे आता शेतकरी आंदोलनावर तोडगा निघण्याची शक्यता अधिक असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत बोलत होते, “जर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट आंदोलकांशी चर्चा केली तर ५ मिनिटांमध्ये ह्या आंदोलनावर तोडगा निघेल. या आंदोलनातून जर काही मार्ग काढायचा असेल तर तो मार्ग केवळ आणि केवळ फक्त मोदीच काढू शकतात.” अशा प्रकारच सूचक वक्तव्य त्यांनी केलं. आज दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक पार पडली. याच पार्श्वभूमीवर राऊत म्हणाले कि, “आज जी भूमिका मोदी यांनी घेतली आहे ती भूमिका जर ६० दिवसांपूर्वीच घेतली असती तर कदाचित आजच चित्र वेगळ असत, परंतु आता तरी मोदी यांनी थेट शेतकऱ्यांशी चर्चा करून लवकरात लवकर तोडगा काढावा.”

महत्वाच्या बातम्या 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!