Share

११ हजार विद्यार्थ्यांनी दिली ऑनलाईन पेट परीक्षा

Published On: 

औरंगाबाद : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने ऑनलाईन पीएच.डी एंट्रन्स टेस्ट शनिवारी घेण्यात आली. ४२ विषयासाठी ११ हजार ६६९ जणांनी नोंदणी केली. यापैकी ११ हजार १५४ विद्यार्थी परीक्षेस उपस्थित होते. तर ६१४ विद्यार्थी अनुपस्थित होते.

चार वर्षापासून रखडलेली पेट-५ ऑनलाईन घेण्याचा निर्णय कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांनी घेतला होता. सकाळी १० ते १ दरम्यान ३० जानेवारी २०२१ रोजी ‘पेट‘ पहिला पेपर ऑनलाईन पध्दतीने परीक्षा घेण्यात आला. १ फेब्रुवारी रोजी निकाल घोषित करण्यात येईल. २१ फेब्रुवारी रोजी दुसरा पेपर घेण्यात येईल. तर १४ फेब्रुवारी रोजी निकाल लागेल. दोन्ही पेपरचा निकाल २८ फेब्रुवारी रोजी लागेल. पेट उत्तीर्ण तसेच संशोधनासाठी पात्र (सेट, नेट, एम.फिल, पाच वर्षाचा अध्यापनाचा अनुभव आदी) विद्यार्थ्यांची नोंदणी मार्चमध्ये पीएच.डीसाठी नोंदणी तर एप्रिल महिन्यात संशोधन मान्यता समितीच्या बैठका घेण्यात येणार आहेत. ४२ विषयात ‘पेट‘ होणार असून विषयनिहाय रिक्त जागा व गाईडची संख्याही प्रकाशित करण्यात येणार आहे.

‘पेट‘चा दुसरा टप्पा १ मार्च ते एप्रिल दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. या टप्प्यात ‘पेट‘ उत्तीर्ण झालेले तसेच ‘पेट‘मधून सुट मिळालेले दुस-या टप्प्यात नोंदणी करण्यासाठी पात्र असणार आहेत. १ ते १५ मार्च दरम्यान ऑनलाईन नोंदणी करता येईल. तर २० मार्च पर्यंत विद्यापीठात ‘हार्ड कॉपी‘ जमा करता येईल. तसेच एप्रिल महिन्यात संशोधन व अधिमान्यता समितीच्या (आरआरसी) बैठक होणार आहे, असे परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.योगेश पाटील यांनी कळविले आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!