औरंगाबाद : शासकीय कला महाविद्यालय औरंगाबाद या संस्थेच्या सुवर्णमहोत्सव वर्षाचे औचित्य साधून शाकम कनेक्ट तर्फे शासकीय कला महाविद्यालयामधून शिकून यश संपादन केलेल्या कलावंतांना आमंत्रित करून आर्ट मंत्रा नावाने सुरु असलेल्या वेबिनार द्वारे मार्गदर्शनपर सेमिनार घेण्यात येणार आहे. या शृंखलेचाच एक भाग म्हणून कै. प्रा. श्री वामन चिंचोळकर यांच्या स्मृती दिना निमित्य परीसंवाद वेबिनारचे आयोजन करण्यात आलं होत.
या निमित्त प्रिंट मेकिंग व पेन्टिंग प्रदर्शन, माजी विधार्थी कक्ष, शाकम कनेक्ट वेबसाईट आदींचे लोकार्पण देखील झाले. या कार्यक्रमात जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, आमदार अंबादास दानवे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्राचार्य, संस्थेतील सर्व प्राध्यापक मंडळी, कर्मचारी आणि शाकम कनेक्टचे काही पदाधिकारी उपस्थितीत होते. हा कार्यक्रम इतर सर्वाना शाकम कनेक्टच्या फेसबुक, युटूबच्या पेजवर लाईव्ह पाहता आला.
या कार्यक्रमासाठी मोईन शेख, महेश औटी, किशोर निकम, नरेश लहाने, शाम तपासकर, संजय खात्री, रमेश माळगे, दीपक जोगदंड,अनंत निकम,बालाजी उबाळे, विजया पातुरकर, शेख पठाण, तुषार मंजुळे, गणेश तरतरे व सर्व माजी विधार्थी परीश्रम घेत आहेत.
महत्वाच्या बातम्या
- एस.टी.बसच्या धडकेत दिव्यांग प्रवासी जखमी
- केंद्र सरकार कृषी कायद्याच्या भूमिकेवर ठाम, मोदींचा पुनुरुच्चार
- मनपाच्या नागरी मित्र पथकाने केली ७६ लाखांवर वसुली
- ब्रेकिंग न्यूज : संजय राऊत आंदोलनस्थळी जाऊन शेतकऱ्यांना भेटण्याची शक्यता
- निवडणूक बिनविरोध करत ‘वृद्धेश्वर’ सहकारी कारखान्यावर पुन्हा राजळेंची सत्ता
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

