Share

साष्टपिंपळगावमधील मराठा समाजाचे उपोषण मागे

Published On: 

औरंगाबाद : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील साष्टपिंपळगाव इथं सुरू असलेले उपोषण मागे घेण्यात आले आहे. पूर्ण राज्यातील मराठा समाजाची बैठक या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

मराठा आरक्षणासाठी २० जानेवारीपासून साष्टपिंपळगावमधील गावकऱ्यांनी आंदोलन सुरू केले होते. यातच २६ जानेवारीपासून मनोज जरांगे पाटील, संतोष ढवळे, बाबासाहेब वैद्य आणि मुक्ताबाई ढेपे उपोषणाला बसले होते. या दरम्यान बाबासाहेब वैद्य यांची प्रकृती अचानक बिघडली होती. तरी देखील या आंदोलनाची दखल शासकीय पातळीवर घेण्यात आली नव्हती. त्यामुळं आंदोलनकर्त्यांमध्ये नाराजी पसरली होती.

या आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी आंदोलन स्थळी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील मराठा समाजातील प्रतिनिधींची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत उपोषण मागे घेऊन केवळ आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार उपोषण सोडण्यात आले. आता साखळी पद्धतीने उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!