Share

IPL 2022: जिमी नीशमने आयपीएलच्या नवीन नियमांबाबत दर्शवली नाराजी; चाहत्यांनी ट्विटरवर झापले

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: आयपीएलच्या १५ व्या सिजनमध्ये अनेक नवीन नियम लागू होणार आहेत. त्यापैकी एक म्हणजे बाद झालेला खेळाडूने झेल घेण्यापूर्वी रेष ओलांडली असेल तरीही नवीन फलंदाजाला स्ट्राइक घ्यावी लागेल. या नियमाला मेरीलेबोन क्रिकेट क्लब (MCC) या क्रिकेटच्या कायदेकर्त्यांनी पाठिंबा दिला आहे. MCC ने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हा नियम लागू केला आहे आणि तो ऑक्टोबर २०२२ पासून लागू होईल.

आयपीएल मात्र आपल्या आगामी सिजनमध्ये हा नियम लागू करणार आहे. न्यूझीलँडचा अष्टपैलू खेळाडू जिमी नीशम (jimmy neesham), जो सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर आपले मन मोकळेपणाने बोलण्यासाठी ओळखला जातो, त्याला हा नियम पटला नाही. नियमाशी असहमत होत त्याने त्याच्या ट्विटरवर लिहिले: “मला याचा मुद्दा खरोखरच समजत नाही. या नियमामुळे कधी समस्या आली आहे का? तसेच हा नियम सामन्याच्या परिस्थितीबद्दल जागरूक नसलेल्या फलंदाजांना मदत देते. तहे मला आवडत नाही. .”

जिमीने त्याचे मत ट्विट करताच क्रिकेट रसिकांनी त्याला धारेवर धरले. बहुतेक जणांनी त्याला नियमांबाबत व्यवस्थित माहिती करून दिली तर काहींनी त्याला खडे बोल सुनावले. क्रिकेट रसिकांनी त्याला गोलंदाजांच्या दृष्टिकोनाने बघायचा सल्ला दिला आहे. जिमी नीशम यंदा राजस्थान रॉयल्स संघाकडून आयपीएलमध्ये खेळणार आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!