Share

…तर काँग्रेस पक्ष आडवा येईल ; भाई जगताप यांची आक्रमक भूमिका

Published On: 

मुंबई : कोरोनामुळे गेल्या वर्षांपासून रखडलेली प्रस्तावित मालमत्ता करवाढ सन २०२१ ते २०२५ या कालावधीत करण्याचा निर्णय पालिकेने घेतला असून, तसा प्रस्ताव बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत मांडण्यात आला. त्यास भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादीने विरोध केल्याने हा प्रस्ताव रोखून धरण्यात आला आहे. २०१७च्या पालिका निवडणुकीत सेनेने ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्याची घोषणा केली होती.

प्रत्यक्षात या करातील फक्त दहा टक्के सर्वसाधारण कर माफ झाला असून, उर्वरित कर मुंबईकरांना भरावा लागतो आहे. त्यामुळे सध्या जनसामान्यांमध्ये सध्या कमालीची नाराजगी आहे. दरम्यान आता महानगरपालिकेने मुंबईकरांवर मालमत्ता कराचा बोजा लादण्याचा प्रयत्न केला तर काँग्रेस पक्ष आडवा येईल, असे वक्तव्य मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी केले. महापौर किशोरी पेडणेकर यांनी आम्ही कोणतीही करवाढ करणार नाही, असे सांगितले आहे. मात्र, पालिकेने पुढील पाच वर्षे करवाढीचा ठरावही आणू नये, अशी काँग्रेसची मागणी असल्याचे भाई जगताप यांनी सांगितले.

भाई जगताप आज मुंबईमध्ये माध्यमांशी बोलत होते. यावेळी ते बोलताना म्हणाले की, ‘मुंबईतील मालमत्ता कराचा प्रश्न हा गंभीर आहे. रेडी रेकनरनुसार दर वाढवले तर ते परवडणार नाही. त्यामुळे 30 ते 40 टक्के बोजा सर्वसामान्यांवर पडेल. कोवीडमध्ये सर्वसामान्य माणूस पिचलाय. त्यामुळे 2025 पर्यंत मुंबईकरांवर करवाढीचा बोजा टाकण्याची बाब काँग्रेस खपवून घेणार नाही, असे भाई जगताप यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!