मुंबई : पुणे शहर काँग्रेसने शहरात एक उपक्रम राबवला असून या उपक्रमाची सध्या मोठ्या प्रमाणात चर्चा होताना दिसून येत आहे.पावसाला सुरुवात होताच आपण आपली जुनी छत्री शोधतो. वर्षभर पडून राहिल्याने या छत्र्या बऱ्याचदा नादुरुस्त झाल्याचं पाहायला मिळते. याच नादुरुस्त छत्र्या मोफत दुरुस्त करण्याची मोहीम काँग्रेसने हाती घेतली आहे.
काँग्रेसच्या या उपक्रमाचे बॅनर सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. या उपक्रमाचा बॅनर ट्विट करत भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी काँग्रेसवर जहरी टीका केली आहे. तसेच, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा उल्लेख दोन चिल्लर पक्ष असा केला आहे. ‘ सध्या दोन चिल्लर पक्षांच्या छता खाली असलेला काँग्रेस पक्ष फुटकळ कामांची किती मोठी जाहिरातबाजी करतोय पाहा…या होर्डिंग च्या किमतीत 50 नव्या छत्र्या आल्या असत्या…’ असा टोला भातखळकर यांनी लगावला आहे.
???????????? सध्या दोन चिल्लर पक्षांच्या छता खाली असलेला काँग्रेस पक्ष फुटकळ कामांची किती मोठी जाहिरातबाजी करतोय पाहा…
या होर्डिंग च्या किमतीत 50 नव्या छत्र्या आल्या असत्या… pic.twitter.com/gp6T8f1yeN— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) June 18, 2021
नेमका काय आहे काँग्रेसचा उपक्रम ?
केंद्र सरकारच्या धोरणांमुळे छोट्या व्यावसायिकांवर आर्थिक संकट आल्याने या उपक्रमाद्वारे त्यांना हातभार लावण्याचा प्रयत्न केला जात आहे असे काँग्रेसतर्फे सांगण्यात आलं. १७ जून ते १९ जून पर्यंत सकाळी ११ ते सहा या वेळात काँग्रेस भवनात नागरिकांना आपल्या छत्र्या मोफत दुरुस्त करुन मिळणार आहेत.
महत्वाच्या बातम्या
- ‘तुला प्रोटोकॉल कळतो का रे?’, अजित पवारांनी बीडच्या मुख्याधिकाऱ्यांना झापले
- ‘तुम्ही काळजी करू नका, आमचं व्यवस्थित सुरुये!’, आघाडीत बिघाडीच्या चर्चेवर अजितदादांचे स्पष्टीकरण
- नितीन गडकरींना धक्का! अमरावतीचे डॉ.सुनील देशमुख काँग्रेसमध्ये
- पालकमंत्री देशमुख यांच्या हस्ते विविध विकासकामांना प्रारंभ, नव्या बससेवेचेही उद्घाटन
- नताशा, देवांगना, आसिफला मिळालेला जमीन सरकारच्या डोळ्यात जळजळीत अंजन घालणारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

