पुणे : मंगळवारी पुण्यातील कात्रज बोगद्याजवळ एका सहा वर्षाच्या मुलाचा आणि सासवड परिसरात एका 35 वर्षीय महिलेचा मृतदेह आढळला होता. संबंधित मायलेकराची हत्या केल्याचं पोलीस चौकशीत निष्पन्न झालं होतं. त्यामुळे सहलीला गेलेल्या या पुण्यातील कुटुंबीयांसोबत नेमकं काय घडलं याचं गूढ बनलं होतं. परंतु या पक्र्नामध्ये आणखी एक धक्कादायकबाब समोर आली आहे.
पत्नी आलिया आणि मुलगा आयान यांचा खून झाल्यानंतर बेपत्ता असलेलेया आबिद अब्दुल शेख (वय ३८) याचा आज सकाळी खानापूर येथे नदीच्या पाण्यात मृतदेह आढळून आला आहे. खडकवासला धरणाच्या पुढे खानापूर येथे एक मृतदेह आढळून आला. तपास करता गेले काही दिवस पुणे व ग्रामीण पोलीस ज्यांचा शोध घेत होते. त्या आबिद शेख यांचा तो मृतदेह असल्याचे लक्षात आले. हवेली पोलीस आणि भारती विद्यापीठ पोलीस घटनास्थळी पोहचले आहेत.
दरम्यान आलीय आणि मुलगा आयन यांचा खून झाल्यानंतर बेपत्ता वडिलांनी मायलेकराची हत्या केल्याचा संशय पोलिसांना होता, त्यानुसारच पुढील तपास केला जात होता. पण मायलेकराच्या हत्याकांडातील मुख्य संशयित असणारे बेपत्ता वडील आबिद शेख यांचाही मृतदेह नदीपात्रात आढळून आल्याने आता परिसरामध्ये खळबळ उडाली आहे. सातारा रोडवर भाड्याने घेतलेली कार पार्क करुन रस्ता ओलांडून जात असताना तेथील सीसीटीव्हीमध्ये अबिद शेख कैद झाला होता.
तेथून तो कोठे निघून गेला, याचा शोध सुरु होता. याप्रकरणी सासवड व भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयान शेख आणि आलिया शेख या मायलेकरांवर मध्य प्रदेशाहून बुधवारी त्यांचे नातेवाईक आल्यानंतर काल अंत्यसंस्कार केले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- भारत-न्यूझीलंड अंतिम सामन्यात पाऊसाचे ‘काळे’ ढग ; सामन्याचं पहिलं सत्र गेलं वाया
- ‘तुम्ही काळजी करू नका, आमचं व्यवस्थित सुरुये!’, आघाडीत बिघाडीच्या चर्चेवर अजितदादांचे स्पष्टीकरण
- नितीन गडकरींना धक्का! अमरावतीचे डॉ.सुनील देशमुख काँग्रेसमध्ये
- पालकमंत्री देशमुख यांच्या हस्ते विविध विकासकामांना प्रारंभ, नव्या बससेवेचेही उद्घाटन
- नताशा, देवांगना, आसिफला मिळालेला जमीन सरकारच्या डोळ्यात जळजळीत अंजन घालणारा


