मुंबई : स्वातंत्र्यदिनानिमित्त आज सकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला संबोधित केले. ‘पुढच्या वर्षीचा स्वातंत्र्यदिन कोरोनामुक्त वातावरणात साजरा करणारच’ अशी प्रतिज्ञा करण्याचं आवाहन केले. तसेच निर्बंध पाळावेत नाहीतर लॉकडाऊन पुन्हा लावावा लागू शकतो असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.
१६ ऑगस्टपासून राज्यात अनेक निर्बंधातून शिथिलता देण्यात आली आहे. याविषयी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, कोरोनाचे संकट दूर करण्यासाठी आपण प्रयत्न करतोय. काही निर्बंध शिथिल केले आहेत. पण, संकट टळले आहे असं आपण म्हणू शकत नाही. जगात काही ठिकाणी पुन्हा कोरोनाने उचल खाल्ली आहे. त्यामुळे आपल्याला काळजी घ्यावी लागेल. लोकांनी धोका लक्षात घ्यावा, असं ठाकरे म्हणाले.
स्वातंत्र्य दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते वर्षा शासकीय निवासस्थान प्रांगणात ध्वजारोहण करण्यात आले. pic.twitter.com/s26P57xWDi
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) August 15, 2021
कोरोना काळात आपण आरोग्यसुविधा वाढवत आहोत. पण ऑक्सिजनची कमतरता चिंतेचा विषय आहे. म्हणून ही शिथिलता देत असताना ऑक्सिजनच्या साठ्याचं प्रमाण ठरवून आपण ही शिथिलता दिली आहे. त्यामुळे कृपा करून दिलेल्या शिथिलतेमध्ये देखील आवश्यक असलेले निर्बंध पाळावे लागतील. कारण ऑक्सिजनचा पुरवठा त्या मर्यादेच्या पुढे गेला, तर कदाचित आपल्याला लॉकडाऊन पुन्हा लावावा लागू शकतो’, असं ते म्हणाले.
टकोरोनाशी लढताना एका गोष्टीचं समाधान आहे की लसीकरणानं वेग घेतला आहे. कालच राज्याने साडेनऊ लाख लोकांना लसीकरण करून एक वेगळा उच्चांक प्रस्थापित केला’ असल्याचं देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. तसेच आज अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करतो आहोत. आज सर्वांनी निश्चय केला पाहिजे, की मी माझा देश कोरोनामुक्त करणारच आणि पुढचा स्वातंत्र्यदिन मुक्त वातावरणात उत्साहात साजरा करणार ही प्रतिज्ञा आपण करुयात असं देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘मला अजितदादाही १२ आमदारांबद्दल बोलत नाहीत, तुम्ही कोण विचारणारे?’ राज्यपालांनी काँग्रेस नेत्याला सुनावले
- ‘जम्मू काश्मीरमध्ये लवकरच विधानसभा निवडणुका’, स्वातंत्र्यदिनी मोदींची मोठी घोषणा
- कोरोना संकटातील भारताची लढाई हा जगभरात चर्चेचा विषय-पंतप्रधान मोदी
- ‘फाळणीने देशाला मोठी जखम, म्हणूनच ‘फाळणी भयस्मृती दिन’ साजरा करणार’
- तिरंगा फडकला! लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींच्या भाषणाला सुरुवात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

