🕒 1 min read
मुंबई: बॉलीवूड अभिनेत्री कंगनाने एका कार्यक्रमात ‘भारताला १९४७ साली मिळालेले स्वातंत्र्य हे स्वातंत्र्य नसून ती भीक होती, खरे स्वातंत्र्य हे २०१४ साली मिळाले असं वक्तव्य अभिनेत्री कंगना रणौतने केलं होते. त्यामुळे मोठा वाद उद्भवला आहे. यावर कंगनाला देण्यात आलेला ‘पद्म श्री’ पुरस्कार परत घेण्यात यावा अशी काही राजकीय पक्षांनी मागणी केली आहे. यावरून आता कंगना “मी शहीदांचा अपमान केल्याचं कोणी सिद्ध करुन दाखवलं, तर मी माझा पुरस्कार परत करेन” असं कंगनाने म्हटलं आहे.
कंगनाने एक इन्स्टाग्रामवर भारताच्या स्वातंत्र्य संघर्षाची माहिती देणाऱ्या पुस्तकातील एक फोटो शेअर केला आहे. “त्याच मुलाखतीत सर्व काही स्पष्टपणे मांडलं होतं. १८५७ ला स्वातंत्र्यासाठी पहिली संघटीत लढाई लढली गेली. सुभाष चंद्र बोस, राणी लक्ष्मीबाई आणि वीर सावरकर यांच्या बलिदानाबद्दलही मी बोलले. १८५७ बद्दल मला माहित आहे. पण १९४७ साली कुठली लढाई झाली, त्या बद्दल मला तरी माहित नाही, कोणी मला त्याबद्दल सांगितलं, तर मी माझा पद्मश्री पुरस्कार परत करीन आणि माफी सुद्धा मागेन, कृपया मला मदत करा” असं कंगनाने म्हटलं आहे.
सध्या कंगना टीकेची धनी ठरली आहे. तिच्याकडून पद्मश्री पुरस्कार परत घ्यावा, अशी मागणीही केली जात आहे. एका कार्यक्रमात कंगनाने हे आक्षेपार्ह विधान केले. या कार्यक्रमात भारतीय स्वातंत्र्याबाबत बोलताना कंगनाने वादग्रस्त विधानांची परंपरा कायम राखत नव्या वादाला तोंड फोडले. तिच्याविरुद्ध अनेक भागात तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे. कंगनाने स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान केला आहे, असा तिच्यावर आरोप आहे.
महत्वाच्या बातम्या
- एस. टी. कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा- राज ठाकरे
- पुस्तकाच्या वादावर सलमान खुर्शिद यांची प्रतिक्रिया; म्हणाले…
- एकरकमी ‘एफआरपी’साठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक; दोन ट्रॅक्टरला लावली आग
- कंगनाबेनच्या बाबतीत टिळकांचं विधान तंतोतंत खरं- संजय राऊत
- ‘जेपी नड्डांनी कर्णपिशाच्चांच्या नादाला लागू नये, नाहीतर भाजप महाराष्ट्रातून नष्ट होईल’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
