Share

“आँधी जब आती है तब क्या-क्या लेके जाती है, हे त्याला माहित नाही”; प्रसाद लाड यांची संजय राऊतांवर टीका

Published On: 

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत(Sanjay Raut) हे आज (मंगळवार) दुपारी चार वाजता शिवसेना भवनात पत्रकारपरिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेमुळे महाराष्ट्रात राजकीय वादळ येणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. गेले काही दिवस भाजपचे किरीट सोमय्या शिवसेना नेत्यांवर गंभीर आरोप करत आहेत. यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांचा देखील समावेश आहे. दरम्यान या सर्व आरोपांना संजय राऊत आज उत्तर देणार आहेत.  या पार्श्वभूमीवर भाजप आमदार प्रसाद लाड(Prasad Lad) यांनी संजय राऊत यांच्यावर खोचक टीका केली आहे.

यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना प्रसाद लाड म्हणाले की,संजय राऊत भरकटलेले असून त्यांना मी काल ‘गेट वेल सुन’चा मेसेज पाठवला. आज पत्रकार परिषद झाल्यावर त्यांना मी पुष्पगुच्छ पाठवणार आहे. तसेच संजय राऊत यांना शिवसेनेमधून पाठींबा नाही, असेही लाड म्हणाले. पुढे ते म्हणाले की,‘जबरदस्तीने शिवसेना नेत्यांना एकत्रित करून पत्रकार परिषद घेण्याचा संजय राऊत जो कांगावा करताय हा जनतेला देखील कळतोय. भाजप अश्या धमक्यांना घाबरत नाही.’ तसेच पुढे संजय राऊतांच्या ट्विटवर प्रत्युत्तर देत लाड म्हणाले की,आँधी से मत लढ़ना औकात मै रहना, आँधी जब आती है तब क्या-क्या लेके जाती है, हे त्याला माहित नाही. मी त्यांना विनंती करतो की जर तुम्ही आम्हाला आँधी म्हणत असाल तर आमच्यापासून घाबरून रहा, असे लाड म्हणाले.

तद्पश्चात संजय राऊतांनी काल साडेतीन लोकांचा खुलासा करणार असल्याचे सांगितले. याविषयी विचारण्यात आले असता संजय राऊत एक चांगले संपादक असून त्यांनी संपादकीय भाषेतून हा शब्द काढला असेल. तसेच ते चित्रपट निर्माते देखील आहेत त्यांचा पुढचा कोणता तरी चित्रपट असेल साडेतीन नावाचा. आम्हाला देखील त्याची उत्सुकता आहे, असा खोचक टोला प्रसाद लाड यांनी यावेळी लगावला.

दरम्यान, ‘शाख़ों से टूट जाएँ वो पत्ते नहीं हैं हम, आँधी से कोई कह दे कि औक़ात में रहे’, असे म्हणत राऊत यांनी विरोधकांना इशारा दिला होता.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!