🕒 1 min read
मुंबई: आज (१५ फेब्रुवारी) शिवसेना भवनात शिवसेनेची पत्रकार परिषद होणार आहे. दुपारी चार वाजता ही पत्रकार परिषद होणार आहे. मात्र त्यापूर्वीच मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. (Sena banner waving before the press conference) शिवसेनेने ‘झुकेंगे नही’ चे बॅनर लावले आहेत. आता या पार्श्वभूमीवर भाजप नेत्यांनी टीका करायला सुरुवात केली आहे.
संजय राऊत भाजपच्या काही नेत्यांची नावं जाहीर करणार असल्याने भाजप सुध्दा त्यांच्या पत्रकार परिषदेवर लक्ष ठेऊन असेल. किरीट सोमय्या आणि संजय राऊत यांच्या आरोप-प्रत्यारोप सुरू असून रोज नवं प्रकरण उघडकीस येत असल्याचं पाहायला मिळतं आहे. तसेच सकाळी पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले होते की पत्रकार परिषदेत बऱ्याच गोष्टी उघडकीस आणणार आहे.
भाजप नेत्या नवनीत राणा यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. संजय राऊत यांनी जर काहीचं केलेलं नाही. तर मग घाबरायचं कारण काय असं भाजपच्या नेत्या नवनीत राणा म्हणाल्या आहेत. तसेच ‘चोर की दाढ़ी में चूगार’ असंही संजय राऊतांना म्हणाल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या:
-
७५ वर्षीय आजोबांचा घोडीवर बसून सुसाट स्टंट ; तरुणाईला लाजवेल असा उत्साह
-
मुंबईत राजधानी एक्सप्रेसची दुचाकीला धडक; काळ आला होता पण वेळ आली नव्हती
-
“… तर किरीट सोमय्यांच्या डोक्याचा, मेंदूचा चिवडाच झाला असता”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
