Share

BREAKING : संजय राऊतांच्या पत्रकार परिषदेआधी भाजप नेत्यांची अचानक दिल्लीवारी; चंद्रकांत पाटील, सोमय्या रवाना

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली: शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेपूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil),किरीट सोमय्या (Kirit Somaiya) दिल्लीला रवाना झाले आहेत. त्यामुळे पत्रकार परिषदेपूर्वीच भाजपच्या मोठ्या राजकीय हालचाली सुरु झाल्याचे दिसत आहेत.

किरीट सोमय्या अगोदरच दिल्लीला जाणार होते. मात्र अचानक चंद्रकांत पाटीलही दिल्लीवारी करीत आहेत. आजच शिवसेना भवनात पत्रकार परिषद होणार आहे. यात संजय राऊत काय आरोप करतात, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहेत. त्यामुळे चंद्रकांत पाटील भाजपच्या प्रमुख नेत्यांची भेट घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज (१५ फेब्रुवारी) शिवसेना नाही तर आज महाराष्ट्र बोलणार असे म्हटले आहे. आज दुपारी ४ वाजता शिवसेना भवनात शिवसेनेची पत्रकार परिषद होणार आहे. राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. तत्पूर्वी शिवसेना भवनाबाहेर ‘झुकेंगे नही’ बॅनर लावले आहेत. तसेच शिवसैनिकांनी काळ्या रंगाचे टी-शर्टही परिधान केले आहेत. त्यावरही ‘झुकेंगे नही’ असा उल्लेख करण्यात आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून संजय राऊत आणि त्यांच्या निकटवर्तीयांवर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी गंभीर आरोप केले आहेत. यावरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही भाजपने निशाण्यावर धरले आहे. आज या सर्वांची उत्तरे मिळतील का? आजच्या पत्रकार परिषदेतून राजकीय भूकंप होणार का? असे प्रश्न आता निर्माण होत आहेत.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!