Share

IPL 2022 : “मन दुखावलं गेलं…”, गुजरातविरुद्धचा पराभव पंतच्या लागला जिव्हारी; वाचा काय म्हणाला तो!

Published On: 

मुंबई : ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली आयपीएलच्या १०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा पराभव झाला. या मोसमातील दिल्ली कॅपिटल्सचा हा पहिला पराभव आहे. गुजरातच्या गोलंदाजीसमोर दिल्लीने कात टाकल्याचे दिसून आले. ज्यामुळे गुजरात टायटन्सने दिल्ली कॅपिटल्सचा १४ धावांनी पराभव केला. ज्यानंतर पराभवाचे कारण सांगताना ऋषभ पंतने मोठे वक्तव्य केले आहे.

आयपीएल २०२२ मध्ये गुजरात टायटन्स (GT) या नव्याने लाँच झालेल्या संघाकडून झालेल्या मानहानीकारक पराभवानंतर दिल्ली कॅपिटल्सच्या (DC) कॅम्पमध्ये निराशा स्पष्टपणे दिसत होती. या पराभवानंतर बोलताना ऋषभ पंत (Rishabh pant) म्हणाला, “माझ्या मते विकेट्सच्या बाबतीत एकूण संख्या इतकी मोठी नव्हती. आम्ही विशेषतः मधल्या षटकांमध्ये चांगली फलंदाजी करू शकलो असतो, आम्ही पॉवरप्लेमध्ये तीन आणि मध्यभागी तीन विकेट गमावल्या. इतक्या विकेट्स गमावल्यानंतर प्रत्येक सामना खडतर होणार आहे, असे मला वाटते. जेव्हा तुम्ही हरता तेव्हा तुमचे हृदय तुटते, पण शेवटी तुम्ही सुधारत राहिल्यास आणि तुमच्याकडे चांगले वातावरण असेल तर तुम्ही नक्कीच पुढच्या सामन्यात चांगली कामगिरी करू शकतात.”

झालेल्या दुसऱ्या सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सची सुरुवात खूपच खराब झाली होती. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा संघ १७२ चा पाठलाग करताना त्यांच्या संपूर्ण षटकात केवळ १५७ धावाच जोडू शकला. त्याचवेळी संघाचा कर्णधार ऋषभ पंत अवघ्या ४३ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.कर्णधाराशिवाय इतर खेळाडूंची कामगिरीही अत्यंत खराब होती. गुजरात टायटन्सकडून संघाचा सुपरस्टार फलंदाज शुभमन गिलने ८४ धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला.

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!