🕒 1 min read
जळगाव : ‘तुम्ही स्वतः सांगत होता की, मी दुचाकीत रॉकेल टाकून फिरायचो. मग, आता तुमच्याकडे एवढी संपत्ती आली कुठून? रॉकेल टाकून… तुमच्या नावावर घराचे, बंगल्यांचे तसेच जमिनीचे एवढे १००-१०० उतारे कसे झाले? याचीही माहिती जनतेला द्या, अशा शब्दांत भाजप नेते आमदार गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना आव्हान दिले आहे.
शनिवारी जामनेर येथे पत्रकार परिषदेत महाजन म्हणाले होते की, ‘आपल्यावर कुणी टीका केली की त्याची बदनामी करायची, असले उद्योग सध्या एकनाथ खडसे करत आहेत. त्यांचे मानसिक संतुलन बिघडलेय, त्यांना मानसोपचार तज्ञाकडे दाखवावे लागणार आहे. खडसेंचा आता राग येत नाही तर कीव येते, अशी टीका महाजन यांनी केली होती.
यावर आज एकनाथ खडसे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. प्राप्तीकर विभागाला सादर केलेल्या विवरणपत्रात दाखविलेल्या माहितीपेक्षा एक रुपयाची जरी मालमत्ता अधिक असली, तर ती मालमत्ता मी महाजनांना दान करेन, असा दावाच खडसे यांनी केला आहे. ‘महाजन यांना मी आव्हान देतो की, माझ्या कौटुंबिक मालमत्तेवर मी जे कमविले असेल, ते प्राप्तीकर विभागाच्या विवरणात आहे. त्याहून एक रुपयांपेक्षा जास्त मालमत्ता असली तरी मी तुम्हाला दान करून टाकेन!’
तसेच राष्ट्रवादी पक्षात आल्यावर भाजपमधील गद्दार कोण होते, याची आपल्याला माहिती मिळाली. भाजपमध्ये कोण कोण गद्दार होते आणि माझ्या मुलीचा पराभव केला हे मला राष्ट्रवादी पक्षात आल्यानंतर समजलं, असं खडसेंनी स्पष्ट सांगितलं आहे. आपण कुणाच्या कृपेने आमदार झाले याची आठवण ठेवावी. उगाच जामनेरवाल्याच्या कानातील कुरघोड्या ऐकत बसू नये, जामनेरवाल्यानेच आपल्या मागे ईडी लावली, वेगवेगळ्या चौकशा लावल्या, इन्कम टॅक्स लावला, असं म्हणत खडसेंनी मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावरही टीका केली.
महत्वाच्या बातम्या
- ‘गांधी हत्येनंतर मिठाई वाटणा-या लोकांना महात्मा गांधी यांच्याच नावाचा आसरा घ्यावा लागतो
- युपीला भेट देण्यासाठी आता व्हिसाची गरज आहे काय? ‘त्या’ घटनेवरून भूपेश बघेलांचा संतप्त सवाल
- ‘काळजी करू नका, तुम्हाला मदत मिळवून देणारच’, फडणवीसांची शेतकऱ्यांना ग्वाही
- शाळेच्या पहिल्या दिवशी लगेच अभ्यास नको; वर्षा गायकवाड पोहचल्या शाळेत
- ‘आपले सरकार आले तरी मोदीसरकार विरोधातील लढाई अजून संपलेली नाही
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
