🕒 1 min read
नांदेड : नांदेड जिल्ह्यातल्या कुंडलवाडी इथं देगलूर पोटनिवडणुकीसाठी झालेल्या प्रचार सभेत बोलत असतांना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पीकविम्यासंदर्भात ठाकरे सरकारवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.
यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की, ‘भागवत कराड हे वित्तराज्यमंत्री झाल्यावर आम्ही त्यांना विचारलं की पीकविमा आपल्या काळात मिळत होता, आता तो का मिळत नाही? यावर त्यांनी विमा कंपन्यांची बैठक बोलावली. त्या विमा कंपन्यांनी धक्कादायक सत्य आपल्यासमोर आणलं. ते म्हणाले, विमा देणार कसा? सरकारच्या हिश्श्याचे जे १७०० कोटी रुपये सरकारने भरायला हवे होते, त्यातला एक नवा पैसा त्यांनी भरलेला नाही. तो जर भरला असता तर ४००० कोटी रुपये आम्ही शेतकऱ्यांना दिले असते. पण जर पैसेच भरले नाहीत, तर विम्याचे पैसे येतील कसे? म्हणजे यांच्याकडे चैनीला पैसा आहे, पण शेतकऱ्यांना हक्काचे पैसे राज्य सरकार भरत नाही म्हणून शेतकरी संकटात आहे.’
दरम्यान, राज्यावर आलेल्या अनेक नैसर्गिक आपत्तींचा जोरदार फटका शेतकऱ्यांना बसला आहे. परंतु या नुकसानीची भरपाई पुरेशा प्रमाणात न मिळाल्याची टीका विरोधी पक्षाकडून सातत्याने केली जात आहे.
महत्वाच्या बातम्या
- पुण्यातील हत्या झालेल्या कबड्डीपटू मुलीच्या कुटुंबियांचे चंद्रकांत पाटलांकडून सांत्वन
- भारतात द्वेष पसरवणारी माहिती हाताळण्यात फेसबुक असमर्थ
- केंद्र सरकारच्या सुडबुद्धीला पुरून उरणार- दिलीप वळसे पाटील
- प्रशासनात अधिकाऱ्यांनी ‘हो’ आणि राजकारण्यांनी ‘नाही’ म्हणायला शिकणे आवश्यक – मुख्यमंत्री ठाकरे
- पिंपळगावच्या कांदा व्यापाऱ्यांकडे तब्बल 100 कोटी बेहिशोबी मालमत्ता
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
