🕒 1 min read
पुणे: एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बिबवेवाडी परिसरात तीन तरुणांनी कोयत्याने वार केल्याची घटना पुण्यात घडली होती. बिबवेवाडी परिसरातील यश लॉन्स याठिकाणी ही घटना घडली. पीडित मुलगी नियमितपणे कब्बडीचा सराव करण्यासाठी संध्याकाळी येथे आली होती. त्याच वेळी तिथे आलेल्या तीन नराधम तरुणांनी तिच्यावर कोयत्याने वार केला होता. दरम्यान या मृत मुलीच्या कुटुंबियांची भेट भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी घेतली आहे.
चंद्रकांत पाटील यांनी या कुटुंबियांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले आहे. याबाबत त्यांनी ट्वीट करत दुःख व्यक्त केले आहे.
पुण्यातील कबड्डीपटू मुलीच्या हत्येने संपूर्ण महाराष्ट्राला हदरवून सोडले. आज या घटनेतील मृत मुलीच्या कुटुबियांची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी मुलीच्या दिव्यांग भावाला आपले दुःख व्यक्त करताना अतिशय वेदना होत होत्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात गुन्हेगारांना जशी शिक्षा होत होती, तशी शिक्षा व्हावी, अशी आर्ततेने मागणी करत होता. त्याची ही वेदना हृदय पिळवटून टाकणारी होती. असे ट्वीट चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.
तरीही तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात गुन्हेगारांना जशी शिक्षा होत होती, तशी शिक्षा व्हावी, अशी आर्ततेने मागणी करत होता. त्याची ही वेदना हृदय पिळवटून टाकणारी होती.
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) October 25, 2021
दरम्यान ही घटना एकतर्फी प्रेमातून झाल्याचे निष्पन्न झाले होते. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात संताप व्यक्त करण्यात आला होता. तर आरोपींना लवकरात लवकर कठोरात कठोर शासन करण्यात येईल. असे आवाहन अजित पवार यांनी त्यावेळी दिले होते.
महत्वाच्या बातम्या
- ‘शाहरुख खानने मलिक आणि राऊतांना रोज उठून कुत्र्यासारखं भुंकण्यासाठी भाड्याने घेतलं असेल’
- एनसीबीद्वारे केंद्राकडून राज्याला बदनाम करण्याचा डाव; छगन भुजबळांचा मोदी सरकारवर निशाणा
- भुजबळांनी नांदगावच्या जागेचा नाद सोडावा, राऊतांचा सल्ला
- …म्हणून मोदी सरकार पेट्रोलचे दर कमी करणार नाही; पृथ्वीराज चव्हाणांची केंद्र सरकारवर टीका
- ‘दिलेले पॅकेजही तोकडे, पण ती मदतही दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा’, भाजपची मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
