मुंबई: राज्यातील महाविकास आघाडी सरकारला पाडण्याचा प्रयत्न सध्या भाजपकडून केला जात आहे. केंद्रातील सरकराचा वापर करून राज्याविरुद्ध डाव खेळला जात असल्याचे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले आहे.
केंद्रातील सरकार राज्याच्या बदनामीसाठी तपास यंत्रणांचा वापर करत आहे. मात्र, काळजी करण्याचे कारण नाही. कारण तपास यंत्रणांनी कितीही त्रास दिला तरी महाविकासआघाडी सरकार त्याला पुरुन उरेल, एवढी क्षमता महाविकास आघाडी सरकारमध्ये असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान महाविकास आघाडी सरकारमधील बऱ्याच नेत्यांवर ईडी ची यंत्रणा तपास करत आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र मोहीम अंतर्गत ते ठाकरे सरकारमधील अनेक नेत्यांचे भ्रष्टाचार उघडकीस आणत आहेत. मात्र यावरच हा डाव म्हणजे महाविकास आघाडी सरकार पाडण्याचे षडयंत्र असल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘शाहरुख खानने मलिक आणि राऊतांना रोज उठून कुत्र्यासारखं भुंकण्यासाठी भाड्याने घेतलं असेल’
- एनसीबीद्वारे केंद्राकडून राज्याला बदनाम करण्याचा डाव; छगन भुजबळांचा मोदी सरकारवर निशाणा
- भुजबळांनी नांदगावच्या जागेचा नाद सोडावा, राऊतांचा सल्ला
- …म्हणून मोदी सरकार पेट्रोलचे दर कमी करणार नाही; पृथ्वीराज चव्हाणांची केंद्र सरकारवर टीका
- ‘दिलेले पॅकेजही तोकडे, पण ती मदतही दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा’, भाजपची मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

